Mahindra XUV 3XO : नवीन कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याचा तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर या वर्षात भारतात कार खरेदी वाढली आहे. सरकारने अलीकडेच जीएसटीच्या रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे लहान गाड्यांच्या किमतीत मोठी कपात झाली आहे. नवीन जीएसटीचे रेट 22 सप्टेंबर पासून लागू झाले आहेत.
त्यानंतर मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात नवीन कार खरेदी करत आहेत. दरम्यान तुम्हालाही येत्या दिवाळीत नवीन कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक फायनान्स प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. Mahindra XUV 3XO खरेदीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी हा फायनान्स प्लॅन उपयुक्त ठरणार आहे.

खरेतर महिंद्रा कंपनीच्या अनेक Suv आहेत. पण जर तुम्ही कॉम्पॅक्ट SUV घेणार असाल तर महिंद्राची ही Mahindra XUV 3XO तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात या फायनान्स प्लॅन बाबत.
दोन लाखांचे डाऊन पेमेंट केल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार?
महिंद्रा कंपनीची XUV 3XO ही एक लोकप्रिय SUV बनली आहे. आता आपण या गाडीचा बेस वेरिएंट खरेदीसाठी दोन लाखाचे डाऊन पेमेंट केल्यास कितीचा हप्ता भरावा लागेल याची माहिती पाहूयात. या लोकप्रिय गाडीच्या बेस व्हेरिएंटची (MX1) एक्स-शोरूम किंमत 7.28 लाख रुपये आहे.
पण दिल्लीत ही गाडी खरेदी करायची झाल्यास ग्राहकांना 8.19 लाख रुपये (ऑन रोड प्राईस) मोजावे लागतील. ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी केल्यास 51 हजार रुपये आरटीओ शुल्क व 39 हजार रुपये इन्शुरन्स प्रीमियम द्यावे लागेल. गाडीची ऑन रोड प्राईस राज्यानुसार व शहरानुसार बदलत असते.
पण याची किंमत आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीसाठी दोन लाख रुपयाचे डाऊन पेमेंट केल्यास दहा हजारापेक्षा कमी ईएमआय भरावा लागणार आहे. समजा एखाद्या ग्राहकाने ही गाडी खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर 6.19 लाख रुपये कर्ज घ्यावे लागणार आहे.
आता एवढे कर्ज बँकेने 9% व्याजदरात 7 वर्षांसाठी मंजूर केल्यास 9 हजार 66 रुपयांचा EMI भरावा लागेल. सात वर्षांच्या काळात दोन लाख 51 हजार रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. अर्थात Mahindra XUV 3XO चे बेस वेरिएंट हफ्त्यावर घ्यायच असल्यास 10.70 लाख खर्च करावे लागतील.