Samsung 5G Smartphone : सॅमसंगचा नवा 5g स्मार्टफोन खरेदी करायचा असेल अन तुमचे बजेट दहा हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. खरेतर फेस्टिव सीजनमध्ये ऑफलाईन मार्केटला तसेच ऑनलाईन मार्केटला मोठमोठ्या ऑफर्स सुरू असतात.
ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन सर्वच स्टोअर्सवर दसरा-दिवाळीच्या काळात फेस्टिव सिझन सेल सुरू असतात. दरम्यान असाच फेस्टिवल सिझन अमेझॉन, फ्लिपकार्टवर सुरू आहे. अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वच वस्तू डिस्काउंटवर मिळत आहेत.

तसेच फ्लिपकार्टवर बिग फेस्टिव धमाका सेल सुरू असून या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन फारच कमी किमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. येथे तुम्हाला सॅमसंगचा 5g स्मार्टफोन दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आहे.
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजवाला सॅमसंग गॅलेक्सी F06 हा 5g स्मार्टफोन लॉन्चिंग प्राईस पेक्षा फारच स्वस्तात उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन अकरा हजार रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. पण आता flipkart च्या सेलमध्ये याची किंमत फक्त 8 हजार 999 रुपये आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 5% कॅशबॅकचा लाभ सुद्धा दिला जात आहे. याशिवाय ग्राहकांना एक्सचेंज बोनसचा सुद्धा लाभ मिळणार आहे. अर्थात ग्राहकांकडे जुना फोन असेल तर तो त्यांना एक्सचेंज करता येणार आहे. पण एक्सचेंज बोनस हा जुन्या मॉडेलच्या कंडिशनवर अवलंबून राहील.
याव्यतिरिक्त ग्राहकांच्या सोयीसाठी ईएमआयची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जर ग्राहकांकडे एक रकमी पैसा नसेल तर ते हप्त्याने हा फोन खरेदी करू शकतील. थोडक्यात ज्या लोकांना दहा हजार रुपयांच्या आत 5g स्मार्टफोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी सॅमसंगचा हा स्मार्टफोन उपयुक्त राहणार आहे.
तसेच हा स्मार्टफोन तुम्हाला कमीत कमी किमतीत घ्यायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवरच्या सेल मध्ये जाऊनच खरेदी करायला हवी. दरम्यान आता आपण या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
हा स्मार्टफोन 6.7 इंच एचडी डिस्प्लेसह येतो. याला 6GB रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलंय. यात डायमेंसिटी 6300 चिपसेटचे प्रोसेसर देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह दोन रीयर कॅमेरे मिळतात. 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. याला 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.