Dividend Stock : शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स तसेच Dividend देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवतात. तुम्हीही अशाच कंपन्यांकडे लक्ष ठेवून असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एका नवरत्न कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड या सरकारी नवरत्न कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला Dividend देण्याची मोठी घोषणा केली असून यामुळे हा स्टॉक फोकस मध्ये आलाय. विशेष बाब अशी की या कंपनीने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 21 वेळा लाभांश देण्याची किमया साधली आहे.

आता कंपनी 22व्या वेळा लाभांश देणार असून यामुळे कंपनीच्या या घोषणेची सगळीकडे चर्चा सुरू आहे. महत्त्वाची बाब अशी की Dividend देण्यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी पुढील आठवड्यातच एक्स डिव्हीडंड ट्रेड करणार आहे.
कंपनी यावेळी आपल्या शेअर होल्डर्स ला 1.320 प्रति शेअर असा लाभांश देणार आहे. कंपनी 22 व्या वेळा आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार असून यासाठीची रेकॉर्ड येत्या सहा दिवसांनी आहे. 10 ऑक्टोबर 2025 ही याची रेकॉर्ड फायनल करण्यात आली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाकडून याबाबतची माहिती स्टॉक एक्सचेंज ला पुरवण्यात आली आहे. कंपनीने 2001 मध्ये पहिल्यांदा आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हीडंडचा लाभ दिला होता. त्यावेळी गुंतवणूकदारांना 0.40 रुपये प्रति शेअर लाभांश मिळाला होता.
तसेच गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रति शेअर 1.24 रुपये डिव्हीडंड देण्यात आला होता. दरम्यान आता कंपनीने पुन्हा एकदा आपल्या शेअर होल्डर्स ला लाभांश देण्याची घोषणा केली आहे. यामुळे हा स्टॉक फोकस मध्ये आला असून आज आपण या स्टॉकची शेअर मार्केट मधील अलीकडील कामगिरी कशी आहे याचा आढावा घेणार आहोत.
नवरत्न सरकारी कंपनीच्या घोषणेमुळे शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 1.53 टक्क्यांनी वाढलेत. काल या कंपनीचे स्टॉक 149.05 रुपयांवर क्लोज झालेत. मात्र गेल्या वर्षात या कंपनीचे स्टॉक 17 टक्क्यांनी घसरले आहेत.
पण गेल्या सहा महिन्यांच्या काळात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 14.70 टक्क्यांनी रिटर्न दिले आहेत. मागील दोन वर्षांच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 19.05% रिटर्न दिले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या काळात या स्टॉकच्या किमतीत 240 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.