Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांमध्ये बँकांच्या एफडी योजनांचे व्याजदर फारच कमी झाले आहे. यामुळे आता गुंतवणूकदार पोस्टाच्या बचत योजनांकडे वळले आहेत. तुम्हीही तुमच्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी इन्व्हेस्ट करणारा असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका भन्नाट योजनेची माहिती सांगणार आहोत.
आज आपण पोस्टाच्या ज्या योजनेबाबत माहिती पाहणार आहोत तिथे गुंतवणूक सुरू केल्यास काही वर्षांनी गुंतवणूकदारांना 40 लाख रुपयांपर्यंतचा फंड मिळू शकतो. ही योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ज्याला पीपीएफ म्हणून ओळखले जाते. ही सरकारची बचत योजना आहे.

या बचत योजनेत गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित आहे तसेच येथे कर सवलतही मिळते. ही योजना पंधरा वर्षांची असून या ठिकाणी गुंतवणूकदारांना वार्षिक जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. ही एक दीर्घकालीन बचत योजना म्हणून ओळखली जाते.
या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथे गुंतवलेली रक्कम करमुक्त असते. या योजनेत गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारांना 7.10% दराने परतावा दिला जातोय. या योजनेत गुंतवलेले पैसे त्यावर मिळणारे व्याज तसेच शेवटी मिळणारा फंड पूर्णपणे करमुक्त असतो.
कसे मिळणार 40 लाख
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत दरवर्षी दीड लाख रुपये गुंतवता येतात. अर्थात प्रत्येक महिन्याला 12500 रुपयांची गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर 7.10% दराने परतावा मिळतो. पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास 7.10% दराने मॅच्युरिटी वर गुंतवणूकदारांना 40 लाख 68 हजार 209 रुपये मिळतात.
यात गुंतवणूकदाराची गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये असते आणि 18 लाख 18 हजार 209 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतात. अर्थात दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदार पंधरा वर्षांनी 40 लाखांचे धनी होतील. या योजनेचे खाते पोस्ट ऑफिस मध्ये तसेच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ओपन करता येते.
या योजनेचे अकाउंट ओपन केल्यानंतर तीन वर्षांनी गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेवर कर्ज काढता येते. तसेच या खात्यातून पाच वर्षांनी अंशता पैसे काढता येतात. अर्थात इमर्जन्सी मध्ये पैशांची गरज असल्यास या योजनेच्या खात्यातून पैसे काढता येतात. नक्कीच ही योजना ज्या लोकांना दीर्घकाळात मोठा निधी तयार करायचा आहे त्यांच्यासाठी फायद्याची ठरेल.