‘या’ आहेत 50 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू होणारे टॉप 3 Business Idea ! 

Published on -

Small Business Idea : अलीकडे बेरोजगारीचे प्रमाण फारच वाढले आहे. अनेक कंपन्यांनी अलीकडे नोकर कपात सुद्धा केली आहे. Ai च्या आगमनामुळे नोकरी मिळवणे तसेच मिळालेली नोकरी टिकवणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत जर तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत.

आज आपण अशा काही बिझनेस बाबत माहिती पाहणार आहोत जे की 50 हजाराच्या आत सुरू होतात. महत्त्वाची बाब म्हणजे कमी गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या या व्यवसायांमधून चांगली कमाई होते. 

50000 च्या आत सुरू होणारे बिजनेस 

अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग युनिट – तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही कमीत कमी 30 – 50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

यासोबतच तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे जीएसटी रजिस्ट्रेशन पण करावे लागेल. या व्यवसायाला बारा महिने मागणी असते. सुगंधित अगरबत्तीचा व्यवसायाला फार मोठा स्कोप आहे. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही महिन्यासाठी 30 – 40 हजार रुपयांची कमाई करू शकता. 

पापड मेकिंग बिजनेस – तुम्हाला कमी गुंतवणुकीत पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. नागली उडीद तांदूळ असे वेगवेगळे पापड बनवून तुम्ही मार्केटमध्ये सेल करू शकता. यासाठी तुम्हाला काही मशीन खरेदी कराव्या लागतील. तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार मशीन खरेदी करून हा व्यवसाय सुरू करू शकता.

छोट्या स्तरावर व्यवसाय सुरू करायचा असेल तर साधारणतः 50000 पर्यंत गुंतवणूक करावी लागेल. या व्यवसायातून सुद्धा महिन्याला 30 – 40 हजार रुपयांची कमाई होऊ शकते. या व्यवसायातून बारा महिने चांगली कमाई होते. पण सणासुदीच्या दिवसांमध्ये व्यवसायातून अधिक कमाई होण्याची शक्यता असते. 

टिफिन सर्विस बिजनेस – हा सर्वात कमी गुंतवणुकीत सुरू होणारा व्यवसाय. हा बिजनेस तुम्ही तुमच्या राहत्या घरातून सुरु करू शकता. तुमच्या शहरात जर कामानिमित्ताने किंवा शिक्षणासाठी इतर भागातील लोक स्थायिक झाले असतील तर या व्यवसायातून तुम्ही चांगली कमाई करू शकणार आहात. हा व्यवसाय महिलांसाठी अधिक फायद्याचा ठरतो.

मोठ्या शहरांमध्ये तसेच अनेक छोट्या शहरांमध्ये देखील आता लोक नोकरी किंवा अभ्यासासाठी एकटे राहतात. आता या लोकांना घरी बनवलेले जेवण हवे असते. यामुळे टिफिन सर्विस बिझनेस फायद्याचा ठरणार आहे. हा व्यवसाय कमी खर्चात घरी सुरू करता येतो. या व्यवसायासाठी सुरुवातीला दहा-वीस हजाराची गुंतवणूक लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe