FD News : आरबीआयने अलीकडेच रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खरेतर रेपो रेटमध्ये कपात करण्यात येईल अशी आशा होती. पण रेपो रेट कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे कर्जांचे व्याजदर पण स्थिर राहणार आहेत. दुसरीकडे या निर्णयामुळे फिक्स डिपॉझिट चे व्याजदर सुद्धा कायम राहणार आहेत.
पण यावर्षी आधीच रेपोरेट एक टक्क्यांनी कमी करण्यात आले असून यामुळे फिक्स डिपॉझिटचे व्याजदरही कमी झाले आहेत. अनेक बँकांनी रेपो रेट कमी झाल्यानंतर एफडीचे व्याजदर घटवले आहे. पण अशाही काही बँका आहेत ज्या की अजूनही आपल्या गुंतवणूकदारांना चांगले व्याज देत आहेत.

बँक ऑफ बडोदा ही सरकारी बँक देखील गुंतवणूकदारांना एफडीवर चांगले व्याज देते. या बँकेत सात दिवसांपासून दहा वर्षांपर्यंत एफडी करता येते. यावर गुंतवणूकदारांना साडेतीन टक्क्यांपासून 7.20 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. ही बँक आपल्या ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर तसेच 444 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते.
बँकेकडून 444 दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.60% व्याज दिले जाते. तसेच सिनिअर सिटीजन ग्राहकांना 7.10% व सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.20% व्याज दिले जाते.
दरम्यान बँकेच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेत दोन लाखांची गुंतवणूक केल्यास ग्राहकांना 47 हजार रुपयांपर्यंत व्याज मिळते. आता आपण बँकेच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेची डिटेल माहिती जाणून घेऊयात.
कसे मिळणार 47 हजारांचे व्याज?
बँक ऑफ बडोदा कडून तीन वर्षांच्या एफ डी वर सामान्य ग्राहकांना 6.50% व्याज दिले जाते. यात गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना सात टक्के व्याज मिळते.
तसेच सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.10% व्याज मिळते. अशा स्थितीत या योजनेत दोन लाखांची गुंतवणूक केल्यास सामान्य ग्राहकांना दोन लाख 42 हजार 682 रुपये मिळतात. म्हणजे सामान्य ग्राहकांना 42,682 व्याज स्वरूपात रिटर्न मिळतात.
तसेच सिनिअर सिटीजन ग्राहकांना दोन लाखाच्या गुंतवणुकीवर 46,288 रुपयांचे व्याज मिळते. त्याचवेळी 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना दोन लाखाच्या गुंतवणुकीवर 47 हजार 15 रुपयांचे व्याज दिले जाते.
अर्थात बँक ऑफ बडोदाची तीन वर्षांची एफडी योजना सिनिअर सिटीजन ग्राहकांसाठी फायद्याची ठरते. ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने एफडी करायची असल्यास BOB चा पर्याय बेस्ट आहे.
तरीही बँकेच्या एफडी योजनेबाबत अधिक माहिती घ्यायची असल्यास बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा बँकेच्या शाखेला भेट देणे आवश्यक आहे.