Banking Shares : येत्या काळात शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना बँकिंग सेक्टरच्या शेअर्स मधून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. तुम्ही देखील बँकिंग स्टॉक खरेदी केले असतील तर ही बातमी नक्कीच तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण टॉप ब्रोकरेजने सांगितलेल्या तीन बँकिंग शेअरची माहिती पाहणार आहोत जे की येत्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 33% पर्यंत परतावा देण्याची क्षमता ठेवतात.
ग्लोबल ब्रोकरेज फर्म सीएलएसएने अलीकडेच एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्ट मध्ये टॉप ग्लोबल ब्रोकरेज फर्मकडून तीन बँकिंग शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे शेअर्स येत्या काळात गुंतवणूकदारांना 33% पर्यंतचे रिटर्न देऊ शकतात असाही अंदाज यामध्ये सांगितला गेला आहे. अशा स्थितीत आता आपण टॉप ग्लोबल ब्रोकरेज फर्मकडून नेमके कोणते तीन स्टॉक सुचवण्यात आले आहेत? याबाबत माहिती पाहणार आहोत.
हे स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल
आयसीआयसीआय बँक – CLSA ने हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. याला बाय रेटिंग देतानाच यासाठी 1700 रुपयांची टार्गेट प्राईज सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. सद्यस्थितीला हा स्टॉक 1365 रुपयांवर व्यवहार करतोय. यानुसार येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 24% पर्यंतचे रिटर्न मिळणार असल्याचा अंदाज या अहवालातून समोर आलाय.
स्टेट बँक ऑफ इंडिया – ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने देशातील सर्वाधिक मोठ्या सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये देखील गुंतवणुकीचा सल्ला दिलाय. टॉप ब्रोकरेज फर्मने यासाठी बाय रेटिंग देतानाच 1050 रुपयांची टार्गेट प्राईस सेट केलेली आहे. सद्यस्थितीला हा स्टॉक 867.05 रुपयांवर ट्रेड करतोय. अर्थातच सध्याच्या स्किमतीपेक्षा यामध्ये 21 टक्क्यांपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे.
बंधन बँक – या बँकिंग शेअरमधून सर्वाधिक रिटर्न मिळतील असा अंदाज ब्रोकरेज फर्मकडून वर्तवण्यात आलाय. सद्यस्थितीला या स्टॉकची किंमत 165.90 रुपयांच्या आसपास आहे. परंतु येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 33 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे. या शेअरसाठी ब्रोकरेज फर्मने 220 रुपयांचे टार्गेट प्राईस सेट करतानाच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. अर्थात या शेअर साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे.