‘या’ आहेत Maruti Suzuki च्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप 10 कार ! 

Published on -

Maruti Suzuki Cars : तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल आणि तुमचे बजेट 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. विशेषता ज्यांना मारुती सुझुकीची कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरेल. मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी.

या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. ही कंपनी मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून नेहमीच बजेट फ्रेंडली कार तयार करत असते. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने अलीकडेच जीएसटी 2.0 लाँच केले आहे.

जीएसटीच्या या नव्या धोरणामुळे छोट्या गाड्यांच्या किमती प्रचंड कमी झाल्या आहेत. सरकारने चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या गाड्यांच्या जीएसटी मध्ये दहा टक्क्यांची कपात केली आहे. यापूर्वी छोट्या गाड्यांसाठी 28 टक्के जीएसटी आकारला जात होता.

पण आता या गाड्यांसाठी फक्त 18% जीएसटी आकारला जातोय. यामुळे छोट्या गाड्यांच्या किमती 22 सप्टेंबर पासून फारच कमी झाल्या आहेत. यामुळे नवीन कार खरेदी करण्यासाठी हा एक बेस्ट टाइमिंग ठरणार आहे.

ज्यांना येत्या दिवाळीत कार खरेदी करायची आहे त्यांना सरकारच्या या नव्या धोरणाचा साहजिकच मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण मारुती सुझुकीच्या दहा लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या टॉप दहा गाड्या बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

1) एर्टिगा – 8.80 लाख रुपये

2) ब्रेझ्झा –  8.25 लाख रुपये 

3) Fronx – सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.85 लाख रुपये 

4) डिजायर – 6.25 लाख रुपये 

5) बलेनो – 5.99 लाख रुपये 

6) स्विफ्ट – 5.78 लाख रुपये 

7) इग्निस – 5.35 लाख रुपये 

8) इको – 5.18 लाख रुपये 

9) वॅगनआर – 4.98 लाख

10) अल्टो – 3.69 लाख रुपये

11) एस प्रेसो – 3.49 लाख रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe