Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय 3500 रुपयांचा डिस्काउंट ! कुठे सुरु आहे ऑफर ?

Published on -

Samsung Smartphone Discount Offer : तुम्हाला सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.  विशेषता त्यांचे बजेट 15000 रुपयांपेक्षा कमी असेल अशा लोकांसाठी आजची बातमी अधिक खास राहणार आहे. सध्या अमेझॉन तसेच फ्लिपकार्टवर फेस्टिवल सेल सुरू आहे.

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये तसेच फ्लिपकार्टच्या बिग फेस्टिवल धमाका सेलमध्ये ग्राहकांना कमी किमतीत स्मार्टफोन खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे या सेलमध्ये फक्त स्मार्ट फोनवरच डिस्काउंट मिळतोय असे नाही तर इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर येथे मोठा डिस्काउंट दिला जात आहे.

दरम्यान तुम्हाला सॅमसंगचा नवा 5g स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी M36 हा स्मार्टफोन खरेदी करायला हवा. ज्या लोकांचे बजेट 15000 रुपयांपेक्षा कमी आहे अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन फायद्याचा ठरेल.

या स्मार्टफोनवर सध्या अमेझॉनमध्ये सुरू असणाऱ्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये 3,500 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. खरेतर, लॉन्चिंगच्या वेळी या स्मार्टफोनची किंमत 17499 एवढी होती. पण आता अमेझॉनवर सुरू असणाऱ्या ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये या 5g स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 इतकी आहे.

अर्थात हा स्मार्टफोन अमेझॉन वरून खरेदी केल्यास ग्राहकांचे जवळपास साडेतीन हजार रुपये वाचणार आहेत. या स्मार्टफोनवर ग्राहकांना सातशे रुपयांचा कॅशबॅक डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे.

याशिवाय एक्सचेंज बोनसचा पण लाभ मिळू शकतो. पण एक्सचेंज बोनस हा तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेलवर आणि कंडिशन वर अवलंबून असेल. दरम्यान आता आपण या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन थोडक्यात समजून घेऊयात.

कंपनी या फोनमध्ये 6.7 इंचाचा एचडी डिस्प्ले देते. हा स्मार्टफोन 6GB रॅम + 128GB इंटरनल स्टोरेजसह उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून कंपनीने या फोनमध्ये डिमेन्सिटी 6300 चिपसेट दिलय. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो.

तर सेल्फीसाठी फोनमध्ये कंपनीने 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याला 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Android 15 आधारित OneUI 7 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. सॅमसंगचा हा फोन बहामा ब्लू आणि लिट व्हायोलेट या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News