‘या’ दिवशी लॉन्च होणार 7000 mAh बॅटरीचा स्मार्टफोन! एकदा चार्ज केल्यास 3 दिवस नो टेन्शन

Published on -

Upcoming Smartphone : तुम्हीही चांगल्या बॅटरी बॅकअप असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात आहात का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर मोटोरोला लवकरच स्मार्टफोन मार्केटमध्ये धमाका करणार आहे. मोटो लवकरच आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार असून या स्मार्टफोन मध्ये ग्राहकांसाठी सात हजार mAh बॅटरी दिली जाणार असल्याचा दावा केला जातोय.

हा नवा अपकमिंग फोन एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल तीन दिवस चार्जिंग करण्याचे टेन्शन राहणार नसल्याचे म्हटले जात आहे. मोटोरोला लवकरच Moto G06 पॉवर 5G लॉन्च करणार आहे. कंपनीने याची लॉन्चिंग डेट सुद्धा जाहीर केली आहे. विशेष म्हणजे फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग साइटवर याची मायक्रोसाईट नुकतीच लाईव्ह करण्यात आली आहे.

यात कंपनीने हा स्मार्टफोन नेमका कधी अधिकृतरित्या लॉन्च होणार याची माहिती सार्वजनिक केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा अपकमिंग स्मार्टफोन येत्या दोन दिवसांनी अर्थात सात ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता लॉन्च केला जाणार आहे.

दरम्यान फ्लिपकार्टवर याची मायक्रोसाईट लाईव्ह झाली असल्याने हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असेल असा अंदाज बांधला जातोय. कंपनीचा हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.

यातील ग्रीन कलर हा फारच युनिक राहणार आहे. अलीकडेच एप्पलने भगव्या कलर मध्ये आयफोन 17 लॉन्च केला आणि आता मोटरोला ग्रीन कलर मध्ये हा आपला नवीन हँडसेट बाजारात उतरवणार आहे. यावरून कंपन्या आता आपल्या स्मार्टफोनच्या कलर्सवर विशेष लक्ष देत असल्याचे दिसते.

या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.88 इंचाचा राहणार आहे. याला कॉर्निंग गोरीला ग्लासचे प्रोटेक्शन असेल. स्मार्टफोनची बॅटरी या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी राहू शकते. 7000 mAh बॅटरीवाला हा स्मार्टफोन एकदा चार्ज केला की तीन दिवस नो टेन्शन. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिसतोय.

रियर कॅमेरा 50 मेगापिक्सलचा राहील. तसेच फ्रंटमध्ये आठ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा राहील. याला मीडियाटेक G81 एक्सट्रीम प्रोसेसरचा सपोर्ट राहणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची झलक दाखवली खरी पण अद्याप याच्या किमती गुलदस्त्यात आहेत. 7 ऑक्टोबरला जेव्हा हा स्मार्टफोन लॉन्च केला जाईल तेव्हाच याच्या किमती अधिकृतरित्या जाहीर केल्या जातील. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News