Tata Motors : जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर टाटा मारुती सुझुकी महिंद्रासह सर्वच दिग्गज ऑटो कंपन्यांच्या लहान गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. अशा स्थितीत जर तुम्हालाही येत्या काळात नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही कामाची माहिती घेऊन आलो आहोत.
आज आपण टाटा मोटर्सच्या दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप सहा गाड्यांबाबत माहिती पाहणार आहोत. खरे तर अलीकडेच केंद्रातील सरकारने जीएसटी मध्ये बदल केले आहेत. सरकारने जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करत फक्त दोन स्लॅब कायम ठेवले आहेत.

सोबतच चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या गाड्यांवरील जीएसटी सरकारने 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणलाय. या निर्णयामुळे छोट्या गाड्यांच्या किमतीत मोठी कपात झाली आहे. अनेक गाड्या 70 – 80 हजार रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत.
टाटा मोटर्सच्या छोट्या गाड्यांच्या किमती सुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड कमी झाल्या असून आज आपण 7 लाखांच्या आतील टाटा मोटर्सच्या टॉप सहा गाड्यांबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
यामुळे जर तुम्हाला येत्या दिवाळीत नवीन कार खरेदी करायची असेल विशेषता टाटा मोटर्सची कार खरेदी करायची असेल आणि तुमचे बजेट 10 लाखांच्या आत असेल तर नक्कीच हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे.
आज आम्ही तुम्हाला ज्या टॉप सहा टाटा मोटरच्या गाड्यांबाबत माहिती सांगणार आहोत तुम्ही यापैकी कोणतेही एक गाडी खरेदी करू शकता. खाली आम्ही तुम्हाला ज्या गाड्यांची किंमत सांगणार आहोत ती किंमत एक्स शोरूम किंमत आहे.
अर्थात या गाड्यांची ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. तुम्हाला गाडीची ऑन रोड प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळील टाटा मोटरच्या अधिकृत डीलरशिप मध्ये जाऊन याबाबत चौकशी करू शकता.
कारचे नाव – किंमत
Tata Curvv – 6.65 लाख
Nexon – 6.32 लाख
अल्ट्रोज – 6.30 लाख
Punch – 5.49 लाख
Tigor – 5.48 लाख
Tiago – 4.57 लाख