Share Market : मागील काही महिने शेअर मार्केट साठी चिंताजणक राहिले आहेत. भू-राजकीय तणाव तसेच अमेरिकेच्या धोरणामुळे इंडियन शेअर मार्केटवर मोठा प्रभाव पाहायला मिळतोय. पण तरीही या दबावाच्या स्थितीतही अनेक शेअर्स गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत आहेत.
दरम्यान जर तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. पुढील बारा महिन्यात शेअर मार्केटमध्ये लिस्ट असणाऱ्या कोणत्या शेअर्स मधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.

खरे तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नेहमीच लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करा असा सल्ला दिला जातो. पण असेही काही स्टॉक असतात जे की शॉर्ट मध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देऊन जातात.
अशा स्थितीत जर तुम्हालाही एक-दोन वर्षांतच चांगले रिटर्न हवे असतील तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरेल. टॉप ब्रोकरेज फर्मने पुढील 12 महिन्यात चांगले रिटर्न देण्याची क्षमता असणारे टॉप 3 शेअर्स सुचवले आहेत. याचं शेअर्स बाबत आज आपण या लेखातून माहिती पाहणार आहोत.
हे शेअर्स पुढील बारा महिन्यात देणार चांगले रिटर्न
अंबुजा सिमेंट – एम के ग्लोबल या ब्रोकरेज फॉर्मने अंबुजा सिमेंटच्या शेअर साठी बाय रेटिंग दिली आहे. अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आलाय. 570 रुपयांच्या रेंजमध्ये हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 650 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. अर्थात या शेअरच्या किमतीत येत्या काळात 14 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
Amara Raja Batteries – या शेअर साठी सुद्धा बाय रेटिंग देण्यात आली आहे. टॉप ब्रोकरेज फर्म नुवामा याने येत्या काही महिन्यात या स्टॉकच्या किमती 12 टक्क्यांनी वाढू शकतात असा अंदाज दिलाय. आज या स्टॉक ची किंमत 993 रुपये आहे. परंतु यासाठी 1120 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.
स्टार सिमेंट – ऍक्सीस सेक्युरिटीज ब्रोकरेज कडून या शेअरसाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. सध्या हा स्टॉक 252 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. पण येत्या काळात स्टॉक ची किंमत 325 रुपयांपर्यंत वाढू शकते. अर्थात या शेअरच्या किमतीत 28 टक्क्यांपर्यंतची वाढ होईल असा अंदाज ब्रोकरेज कडून देण्यात आला आहे.