Bonus Share And Stock Split : तुम्हालाही तुमच्या पोर्टफोलिओत नवीन शेअर्स ॲड करायचे असतील तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. खरंतर अनेक जण बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट तसेच डिव्हीडंड देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात. महत्वाची बाब म्हणजे वेळोवेळी शेअर मार्केट मधील कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी अशा लाभाच्या घोषणा करत असतात.
दरम्यान आता शेअर मार्केट मधील एका कंपनीने एकाच वेळी बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. नर्मदा मॅकप्लास्ट ड्रिप इरिगेशन सिस्टीम्सने हा निर्णय घेतला आहे. गुजरात राज्यातील या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स चे मूल्य वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की कंपनीने 1:5 असे शेअरचे विभाजन करण्याचा आणि गुंतवणूकदारांना 1:1 बोनस शेअर्स देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा कंपनीने नुकतीच फायनल केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून याची माहिती स्टॉक एक्सचेंजला कळविण्यात आली आहे.
या निर्णयानंतर 10 रुपये फेस व्हॅल्यू असणारे प्रत्येक इक्विटी शेअर आता पाच शेअरमध्ये विभाजित होणार आहेत. म्हणजे या विभाजनानंतर शेअरची फेस व्हॅल्यू प्रत्येकी 2 रुपये होणार आहे. हा शेअर सध्या 202 रुपयांवर व्यवहार करतोय. दरम्यान शेअर्सचे विभाजन झाल्यानंतर शेअर होल्डर्स ला प्रत्येक एका शेअर मागे एक शेअर बोनस दिला जाणार आहे.
म्हणजेच एका शेअरवर एक शेअर बिलकुल फ्री मिळणार आहे. त्यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा कंपनीने फायनल केली आहे. दरम्यान कंपनीच्या या निर्णयानंतर शेअर होल्डर्स कडील शेअर्सची संख्या वाढणार आहे तसेच नव्याने जे लोक गुंतवणूक करणार आहेत त्यांना शेअर्स खरेदी करणे सोपे होणार आहे.
या निर्णयाचा छोट्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक लाभ होईल अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. दरम्यान यासाठीची रेकॉर्ड डेट येत्या पाच दिवसांनी असेल. 10 ऑक्टोबर 2025 ही या कॉर्पोरेट ॲक्शन साठीची रेकॉर्ड डेट कंपनीकडून निश्चित करण्यात आलीये.
30 सप्टेंबर 2025 रोजी कंपनीच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार आता या तारखेपर्यंत ज्या शेअर होल्डर चे नाव कंपनीचे रेकॉर्ड बुक मध्ये असेल त्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे.