संपूर्ण भारतभर प्रवास केला तरी सुद्धा ‘या’ यादीतल्या लोकांना एकही रुपया Toll Tax भरावा लागत नाही ! पहा संपूर्ण यादी…

Published on -

Toll Tax List : देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांचे एक मोठे जाळे तयार करण्यात आले आहे. शासनाने नवनवीन महामार्गाची निर्मिती केली आहे. सरकारकडून देशात अनेक राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही समृद्धी महामार्ग सारखे हायटेक रस्ते विकसित झाल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व जलद झालाय.

परंतु कोणत्याही राष्ट्रीय महामार्गांवरून किंवा एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना प्रवाशांना टोल टॅक्स द्यावा लागतो. दुचाकी वगळता इतर वाहनचालकांना टोल भरावा लागतो. दुचाकीला टोल द्यावा लागत नाही कारण की जेव्हा दुचाकीचे रजिस्ट्रेशन होते तेव्हाच टोलचा पैसा वसूल केलेला असतो.

या टोल टॅक्समुळे अनेक जण हैराण झालेले आहेत. अलीकडे सरकारने फास्टटॅग पास सुरू केला आहे पण हा पास फारच मर्यादित महामार्गांवर लागू होतो. यामुळे जे लोक नेहमीच भ्रमणावर असतात अशा लोकांना टोल टॅक्समुळे मोठा भुर्दंड बसत असतो. पण देशात असेही काही लोक आहेत ज्यांना संपूर्ण देशभर टोल टॅक्स माफ असतो.

अर्थात हे लोक कुठेही फिरले तरी देखील त्यांना एकही रुपया टोल भरावा लागत नाही. महत्त्वाचे म्हणजे तो महामार्ग केंद्राच्या अखत्यारितला असो किंवा राज्याच्या अखत्यारितला असो, महामार्ग कोणताही असला तरी सुद्धा या लोकांना एकही रुपया सुद्धा टोल भरावा लागत नाही आणि यांची गाडी टोलवर थांबत सुद्धा नाही.

नक्कीच आता तुम्हाला या लोकांबाबत माहिती जाणून घ्यायची असेल. दरम्यान आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही लोकांची एक यादी आणली आहे. आज आपण जी यादी पाहणार आहोत त्या यादीमध्ये समाविष्ट लोकांना देशात कुठेच टोल द्यावा लागत नाही.

या लोकांना देशातील कोणत्याच महामार्गांवर टोल लागत नाही

राष्ट्रपती

उपराष्ट्रपती

पंतप्रधान

मुख्य न्यायाधीश

राज्यपाल

उपराज्यपाल

केंद्रीय मंत्री

राज्यांचे मुख्यमंत्री

उच्च न्यायालयांचे न्यायाधीश

राज्यसभेचे अध्यक्ष

लोकसभेचे अध्यक्ष

राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष

राज्य विधानसभेचे अध्यक्ष

मुख्य न्यायाधीश 

उच्च न्यायालयांचे इतर न्यायाधीश

राज्यांचे मंत्री

संसद सदस्य

भारत सरकारचे सचिव

राज्यसभा व लोकसभेचे सचिव

राज्यांमधील विधानसभा व विधान परिषदांचे सदस्य (आमदार)

अधिकृत दौऱ्यांवर असलेले उच्चपदस्थ परदेशी मान्यवर

संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी

अधिकृत कामासाठी जाणारे अधिकारी

भारतीय लष्कर

नौदल व हवाई दल

Paramilitary force

Central and Armed Forces Police

गणवेशातील अधिकारी

कार्यकारी दंडाधिकारी

अग्निशमन विभाग किंवा संघटना

एनएचएआय किंवा अशा कोणत्याही संस्थेचे लोक

परमवीर / अशोक / महावीर / कीर्ती / शौर्य चक्र विजेते लोक 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News