Share Market मधील गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ महिन्यात 3 कंपन्या देणार Dividend

Published on -

Share Market Tips : शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना दिवाळीच्या आधीच मालामाल होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधून मोठी कमाई करता येणार आहे. कारण की या आठवड्यात तीन कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहेत.

नक्कीच या निर्णयाचा संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या शेअर होल्डर्स ला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या आठवड्यात कोणत्या तीन कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांची देतील आणि याची रेकॉर्ड नेमकी कोणती आहे, ते कोणत्या तारखेला एक्स डिव्हीडेंट ट्रेड करतील याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

 कोणत्या कंपन्या देणार डिव्हिडंट

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या सरकारी कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही कंपनी 1.32 रुपये प्रति शेअर याप्रमाणे लाभांश देणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे याची एक्स डेट व रेकॉर्ड डेट 10 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. अर्थात या तारखेपूर्वी ज्या शेअर होल्डर्स कडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना लाभांश दिले जातील.

Hexaware Technologies या दिग्गज आयटी कंपनीने देखील आपल्या गुंतवणूकदारांना यावर्षी लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी 5.75 रुपये प्रति शेअर या प्रमाणे गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट 10 ऑक्टोबर निश्चित करण्यात आलीये.

म्हणजे या तारखेआधी ज्या लोकांकडे या कंपनीचे शेअर्स असतील त्यांना लाभांश मिळणार आहे. पण या तारखेनंतर शेअर्स घेणाऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही. खरंतर अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स देणाऱ्या तसेच डिव्हीडंट देणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात. अशा गुंतवणूकदारांसाठी नक्कीच ही एक मोठी संधी राहणार आहे.

Cybertech Systems and Software कंपनीने सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने 20 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची घोषणा केली आहे. पण याची एक्स डेट सहा ऑक्टोबर आहे. अर्थात आज याचे एक्स डिव्हीडंड ट्रेड होणार आहे.

म्हणजेच जर तुमच्याकडे कंपनीचे शेअर्स नसतील तर तुम्हाला या लाभांशाचा लाभ मिळणार नाही. कालपर्यंत ज्या शेअर होल्डर्सकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News