Maharashtra State Employee : दिवाळी आधीच राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेळेत वेतन मिळावे तसेच सण अग्रीम मिळावे यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या पगारासाठी सात ऑक्टोबर रोजी 471.05 कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान आता सण-अग्रीम बाबतही महत्त्वाचा निर्णय झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी दरवर्षी त्यांना सण-अग्रीम दिला जातो. थोडक्यात त्यांना दिवाळी सणानिमित्ताने उचल मिळते. यावर्षी दिवाळी 21 ऑक्टोबर रोजी साजरा होईल.
दरम्यान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आता ऊत्सव अग्रीम उचल मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. एसटी महामंडळाने सण अग्रीम बाबत एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे.
या शासन परिपत्रकानुसार ज्या कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये उत्सव अग्रीम घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. हा अर्ज विभाग नियंत्रकाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान सादर झालेल्या अर्जांची तपासणी करून यासाठी पात्र ठरणाऱ्या अर्जदारांची यादी 15 ऑक्टोबर पर्यंत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयाकडे जमा केली जाणार आहे.
यानंतर मग संबंधितांच्या खात्यात सण अग्रीम वर्ग करण्यात येणार आहे. पण सण-अग्रीम रक्कम 43,477 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा पगार या लिमिट पेक्षा जास्त असेल त्यांना उत्सव अग्रीम दिली जाणार नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच येत्या दहा महिन्यांच्या आत रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. पण यासाठी कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करता येणार नाहीत. उत्सव अग्रीम साठी स्वातंत्र्य अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत.
यासाठीचा अर्ज हा शाखाप्रमुखांच्या माध्यमातूनचं सादर करावा लागणार आहे. नक्कीच दिवाळीच्या आधी दिल्या जाणाऱ्या या रकमेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
खरे तर एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले जाईल असा इशारा दिला होता. 13 ऑक्टोबर पासून एसटी कर्मचारी आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत.
पण त्या आधीच एसटी कर्मचाऱ्यांना शासनाकडून गुड न्यूज मिळाली आहे. यामुळे आता ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.