पुढील आठवड्यात ‘हे’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! Divedend आणि Bonus Share चा लाभ मिळणार

Published on -

Share Market News : पुढील आठवडा शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी विशेष फायद्याचा ठरणार आहे. खरे तर आता शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्यांच्या माध्यमातून आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जात आहेत. सप्टेंबर तिमाही निकालामुळे सध्या अनेक स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.

निकाला सोबतच शेअर मार्केट मधील काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट बेनिफिट सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. गतकाही दिवसांमध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर तसेच लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान पुढील आठवड्यात देखील चार बड्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना डिविडेंट आणि बोनस शेअर चा लाभ देणार आहे. येत्या आठवड्यात चार कंपन्यांची बोनस शेअरची आणि डिव्हीडंटची रेकॉर्ड डेट आहे. यामुळे जे गुंतवणूकदार बोनस शेअर्स तसेच डिव्हिडेंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असतील त्यांच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे.

या शेअर्स मधून कमाईची संधी 

Concorn Control Systems – ही कंपनी शेअर होल्डर्सला पाच शेअर्सवर तीन बोनस शेअर्स देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट 16 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. 

वेलक्योर ड्रग्ज अँड फार्मा – ही कंपनी एकाच वेळी शेअर्स विभाजन आणि बोनस शेअरचा लाभ देणार आहे. कंपनी एका शेअरचे दहा शेअर्समध्ये विभाजन करणार आहे. तसेच दहा शेअर्स मागे एक शेअर बोनस दिला जाईल. कंपनीने याची रेकॉर्ड डेट 16 ऑक्टोबर निश्चित केली आहे.

TCS – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रति शेअर अकरा रुपये डिव्हीडंड देणार आहे. कंपनीने याची रेकॉर्ड डेट 15 ऑक्टोबर निश्चित केली आहे. 

Anand Rathi Wealth – ही कंपनी देखील आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. पण कंपनीकडून किती लाभांश मिळणार याची घोषणा झालेली नाही. मात्र यासाठीची रेकॉर्ड 17 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. तसेच लाभांश देण्याबाबतचा निर्णय सोमवारी घेतला जाणार असल्याची माहिती संचालक मंडळाकडून समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe