‘या’ स्मॉल कॅप शेअर्सने चार महिन्यात गुंतवणूकदारांना दिलेत 431% रिटर्न ! आता देणार Bonus Share 

Published on -

Small Cap Company : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्यासाठीचं आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार सुरू आहे. यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. अनेकांनी शेअर मार्केट व म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक थांबवली आहे.

शेअर मार्केट ऐवजी अनेक लोक आता सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहेत. पण अशा या अस्थिरतेच्या वातावरणात देखील काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवतायेत.

आरोग्य आणि कन्फेक्शनरी उत्पादन कंपनी सॅम्प्रे न्यूट्रिशन्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून चांगली वाढ होताना दिसत आहे. या शेअर्सने गेल्या चार महिन्यांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 431% रिटर्न दिले आहेत. दरम्यान आता कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

यामुळे जे गुंतवणूकदार कॉर्पोरेट लाभ देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असतील त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. गत काही दिवसांपासून शेअर मार्केट मधील लिस्ट कंपन्यांकडून आपले सप्टेंबर महिन्याचे तिमाही निकाल जारी केले जात आहेत.

सोबतच बोनस शेअर्स आणि डिव्हीडंट देण्याची मोठी घोषणा देखील केली जात आहे. दरम्यान जर तुम्हालाही बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करायचे असेल तर दिवाळीच्या आधी तुम्ही सॅम्प्रे न्यूट्रिशन्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हवी.

खरंतर ही कंपनी आपल्या शेअर होल्डर्स ला बोनस शेअर चा लाभ देणार आहे सोबतच शेअर्सचे विभाजन म्हणजेच Stock Split सुद्धा करणार आहे. दरम्यान या दुहेरी लाभांमुळे सध्या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअरचे वाटप करण्यात येणार आहे.

अर्थात कंपनीकडून प्रत्येक एका शेअरमागे एक स्टॉक बोनस दिला जाणार आहे. परंतु बोनस शेअर साठीची रेकॉर्ड डेट अजून निश्चित झालेली नाही. सोबतच ही कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्याचा शेअर 5 रुपये दर्शनी मूल्याच्या दोन शेअर्समध्ये विभागणार आहे. Stock Split ची रेकॉर्ड डेट सुद्धा अजून ठरलेली नाही.

पण लवकरच कंपनीकडून रेकॉर्ड जाहीर करण्यात येणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर होता. यामुळे ज्यांना कॉर्पोरेट बेनिफिट जसे की बोनस शेअर्स, डिव्हिडेंट याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी तात्काळ या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी फायदेमंद ठरणार आहे. तरीही गुंतवणुकी आधी गुंतवणूकदारांनी कंपनीची सर्व इत्यभूत माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News