Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आम्ही एक खास माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
शेतकऱ्यांना पीक उत्पादित करण्यासाठी आलेला खर्च सुद्धा भरून काढता येत नसल्याची वास्तविकता आपल्याला पाहायला मिळते. एक तर नैसर्गिक संकटांमुळे सोयाबीन पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे आणि दुसरे म्हणजे उत्पादित झालेल्या मालाला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी बाजूने कोंडी होत आहे.

यंदाही अशीच परिस्थिती दिसते. विजयादशमीपासून नवीन सोयाबीन हळूहळू बाजारात येऊ लागला आहे. मात्र अद्याप सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नाहीये. यावर्षी पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून अपेक्षित उत्पादन सुद्धा मिळालेले नाही.
अशा स्थितीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून आज आपण दिवाळीत तसेच दिवाळीनंतर सोयाबीनला बाजारात काय भाव मिळेल याबाबतचा आढावा घेणार आहोत. पुढील पंधरा दिवसांमध्ये पिवळं सोनं सोयाबीन शेतकऱ्यांना तारणार की त्यांचाच बाजार उठवणार या संदर्भात तज्ञांकडून काय माहिती देण्यात आली आहे
या संदर्भात आज आपण या लेखातून डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सध्या सोयाबीनला साडेतीन हजार रुपये ते 4 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय. सध्या सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू आहे.
अनेक भागात पीक भुईसपाट झाले असून जेवढे पीक शाबूत राहिले आहे त्यांची शेतकऱ्यांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हार्वेस्टिंग नंतर लगेच शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी लागणार आहे. पैशांच्या अडचणीमुळे शेतकरी बांधव लगेचच सोयाबीन विक्री करताना दिसतात.
पण सध्याचा बाजार भाव हा त्यांच्या फायद्याचा नाहीये. या भावात पिकासाठी आलेला खर्च सुद्धा भरून निघणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात 4515 ते 4895 रुपये प्रति क्विंटल यादरम्यान भाव मिळू शकतो असा अंदाज देण्यात आला आहे.
खरे तर केंद्रातील सरकारने या हंगामासाठी सोयाबीनला 5328 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी म्हणजेच किमान हमीभाव जाहीर केला आहे. पण सध्या हमीभावा एवढा ही दर सोयाबीनला मिळत नसून यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. यावर्षी सोयाबीनचे उत्पादन आठ टक्क्याने घटणार असा अंदाज आहे.
तसेच बाजारात सोयाबीनचे अद्याप अपेक्षित आवकही होत नाहीये. मात्र अशी सगळी परिस्थिती असतानाही सोयाबीनला हमीभाव एवढा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.