HDFC बँकेकडून एक कोटी रुपयांचे होम लोन घ्यायचे असेल तर महिन्याचा पगार किती पाहिजे ? 

Published on -

Home Loan : नवीन घर खरेदी करणार आहात का? नव्या वास्तूसाठी तुम्हाला होम लोन हव आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास पाहणार आहे. विशेषता ज्यांना एचडीएफसी बँकेकडून गृह कर्ज घ्यायचे असेल त्यांच्यासाठी आजची बातमी विशेष राहील.

कारण की आज आपण एचडीएफसी बँके कडून एक कोटी रुपयांची होम लोन घेण्यासाठी महिन्याचा पगार नेमका किती हवा याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या वर्षात आरबीआयने रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात केली आहे.

आरबीआयच्या या निर्णयानंतर एचडीएफसी सहित सर्वच बँकांनी होम लोनचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे सध्याचा काळ हा होम लोन घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरतोय. अशा स्थितीत तुम्हाला ही नवीन घर घ्यायचं असेल तर आजचा हा काळ गृह कर्ज घेण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

तुम्हाला आता स्वस्तात गृह कर्ज मिळणार आहे. एचडीएफसी बँकेने सुद्धा गृह कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत यामुळे एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेणे सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

एचडीएफसी बँकेचे व्याजदर 

एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. मार्केट कॅपिटल नुसार भारतातील टॉप 10 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेचा सुद्धा समावेश होतो. महत्त्वाची बाब म्हणजे बाजार भांडवलानुसार एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी बँक बनली आहे.

बाजार भांडवलाच्या बाबतीत एसबीआय पेक्षाही एचडीएफसी मोठी आहे. दरम्यान ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आजच्या घडीला किमान 7.90% व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.

पण हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे याचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच मिळतोय. 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना किमान व्याजदरात गृह कर्जाचा लाभ मिळतोय.

एक कोटीच्या गृहकर्जांसाठी किती पगार हवा?

एक लाख 50 हजार रुपये मासिक पगार असणाऱ्याला 20 वर्षांसाठी एक कोटी रुपयांच गृह कर्ज मंजूर होऊ शकते. बँकेने एखाद्याला एक कोटी 5 हजार 749 रुपये कर्ज मंजूर केलं. हे कर्ज वीस वर्षांसाठी 7.90% व्याज दरात मंजूर झालं तर महिन्याला 80 हजार तीनशे रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe