Bonus Share : शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्यांच्या माध्यमातून सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच कंपनी आपल्या शेअर होल्डर्स ला कॉर्पोरेट बेनिफिट सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. बोनस शेअर्स, डिव्हिडंट, स्टॉक split च्या निर्णयामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स सध्या फोकस मध्ये आहेत.
दरम्यान जर तुम्ही ही अशाच कॉर्पोरेट लाभाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एचडीएफसी ग्रुप कडून लवकरच एक मोठी आनंदाची बातमी समोर येणार आहे. एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून आपल्या शेअर होल्डर्स ला लवकरच बोनस शेअर्स दिले जातील अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

दरम्यान ही बातमी समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये देखील तेजी आली आहे. तीन दिवसांपूर्वी अर्थात 10 ऑक्टोबरला एक बातमी समोर आली होती ज्यामध्ये एचडीएफसी असेल मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड आपल्या शेअर होल्डर्स ला बोनस शेअर्स देऊ शकते असा दावा करण्यात आला होता.
दरम्यान ही बातमी ब्रेक झाल्यानंतर आज सोमवारी या कंपनीचे शेअर्स तेजीत पाहायला मिळाले. एचडीएफसी ग्रुपच्या या कंपनीकडून शेअर होल्डर्स ला रिवॉर्ड मिळणार अशा चर्चा सुरू झाल्याने हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर बाबत निर्णय होऊ शकतो अशी आशाही व्यक्त करण्यात आली आहे. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक येत्या दोन दिवसांनी होणार आहे.
15 ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या या बैठकीत कंपनी बोनस शेअर्सबाबत निर्णय घेणार आहे. तसेच या बैठकीत कंपनी तिच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर सुद्धा चर्चा करणार आहे. खरेतर ही कंपनी 2018 मध्ये सूचीबद्ध झाली. पण तेव्हापासून आत्तापर्यंत कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स ला कधीच बोनस शेअर दिलेले नाहीत.
कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स ला डिवीडेंट मात्र दिले आहेत. परंतु बोनस शेअर बाबतचा निर्णय झाला तर ही कंपनीची पहिलीच वेळ राहणार आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर होल्डर्समध्ये देखील याबाबत कंपनी नेमका काय निर्णय घेणार याविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
सोमवारी एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. बीएसईवर हा शेअर 5 हजार 574 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. दरम्यान गेल्या बारा महिन्यांमध्ये कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना 27% रिटर्न दिले आहेत. तर मागील सहा महिन्यात 40 टक्क्यांचे रिटर्न मिळाले आहेत.