Dividend Stock : शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ही बातमी बोनस शेअर्स तसेच डिव्हिडेंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्यांच्या माध्यमातून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत.
सोबतच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि डिवीडेंट सारख्या कॉर्पोरेट लाभाची देखील घोषणा केली जात आहे. दरम्यान जर तुम्हाला ही बोनस शेअर्स आणि डिव्हीडंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.

खरंतर शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या आनंद राठी वेल्थ लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसापूर्वी लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली होती. आनंद राठी वेल्थ लिमिटेडकडून आपल्या शेअर होल्डर्स ला सहा रुपये लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली होती.
तसेच या लाभांशासाठीची रेकॉर्ड डेट 17 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना डिव्हीडंटचा लाभ मिळणार आहे. अर्थात आज हा शेअर्स खरेदी करण्याची गुंतवणूकदारांना शेवटची संधी आहे.
ज्या गुंतवणूकदारांना डिव्हीडंड मधून कमाई करायची असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी राहणार आहे. खरेतर आज या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकाउंट मध्ये हे शेअर्स उद्याला जमा होणार आहेत. अर्थात आज जे लोक या कंपनीचे स्टॉक खरेदी करतील त्या लोकांना Dividend चा लाभ मिळणार आहे.
आनंद राठी वेल्थ लिमिटेड च्या शेअर्स बाबत बोलायचं झालं तर आज यामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली. सध्या स्थितीला हा स्टॉक 3111 च्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. खरे तर कंपनीने बुधवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.
दरम्यान आता उद्या कंपनी एक्स डिव्हीडंड ट्रेड करणार आहे. त्यामुळे सध्या या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आहे. या कंपनीच्या स्टॉक चे शेअर मार्केट मधील कामगिरी बाबत बोलायचं झालं तर गेल्या सहा महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 66% हून अधिक रिटर्न दिले आहे.
तसेच मागील एका वर्षात या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 46% रिटर्न दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे लॉन्ग टर्म मध्ये या शेअर्सने गुंतवणूकदाराला चांगला पैसा दिला आहे. मागील पाच वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 940% रिटर्न दिले आहे.