सरकारी कर्मचाऱ्यांची दिन दिन दिवाळी ! दीपोत्सवात किती दिवस राहणार सुट्ट्या? समोर आली यादी

Updated on -

Government Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दीपोत्सवाची वाट पाहिली जात होती त्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दिवाळी निमित्ताने सगळीकडे उत्साह पाहायला मिळतोय. बाजारपेठा पण सजल्या आहेत.

आज गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस आहे. आज पासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान या दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांना सहा दिवस सुट्टी राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत किती दिवस सुट्ट्या राहणार याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

आता आपण कोणत्या दिवशी शासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार याची माहिती जाणून घेणार आहोत. आज गोवत्स द्वादशी पासून दिवाळीला सुरुवात होत आहे. पण शासकीय कार्यालयांना उद्यापासून सहा दिवसांची सुट्टी राहणार आहे. 

या तारखेला सुट्टी राहणार

तारीखसुट्टीचे कारण
18 ऑक्टोबरशासकीय सुट्टी
19 ऑक्टोबरशासकीय सुट्टी
20 ऑक्टोबरनरक चतुर्दशी ( सोलापूर जिल्हाधिकारी अधिकार क्षेत्रातील सुट्टी)
21 ऑक्टोबरलक्ष्मीपूजन निमित्ताने शासकीय सुट्टी 
22 ऑक्टोबरदिवाळी पाडवा निमित्ताने सुट्टी 
23 ऑक्टोबरभाऊबीज निमित्ताने राज्य शासनाने मंजूर केलेली सुट्टी 

अर्थात शनिवारपासून दिवाळी सुट्टीला सुरुवात होईल आणि गुरुवारपर्यंत सलग सहा दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका तसेच राज्य शासनाच्या सर्व विभागांना या सहा दिवसांत सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी सलग सहा दिवस सुट्टी मंजूर करण्यात आली असल्याने सरकारी कर्मचारी खुश झाले आहेत. दीपोत्सवानिमित्त राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून बोनस सुद्धा मंजूर करण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना शासनाकडून यावर्षी सहा हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना तसेच मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बोलत देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी 31 हजाराचा भोरस मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News