दररोज 30 रुपये वाचवा अन 1.17 कोटी रुपये मिळवा ! वाचा सविस्तर

Published on -

Mutual Fund SIP : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकजण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून चांगला मोठा फंड तयार करत आहेत. दरम्यान जर तुम्ही हे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे.

खरंतर आपण दररोज 50-100 रुपये अशा ठिकाणी खर्च करतो जे की गरजेचे नसते. या अशा छोट्या खर्चांचा अनेकदा हिशोब सुद्धा लागत नाही. पण जर तुम्ही तुमची अनावश्यक खर्च करण्याची सवय नियंत्रणात ठेवली आणि दररोज फक्त 30 रुपयांची म्हणजेच महिन्याला 900 रुपयांची एसआयपी सुरू केली तर तुम्ही काही वर्षांनी करोडपती बनू शकता.

कदाचित तुम्हाला हे वाचून थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. म्युच्युअल फंड मधील एस आय पी मध्ये गुंतवणूकदारांना कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळत असते. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये एसआयपी केल्यास गुंतवणूकदारांना प्रचंड लाभ मिळतो.

तुमचा अनावश्यक खर्च कमी करून जर तुम्ही महिन्याला फक्त नऊशे रुपयांची एसआयपी सुरू केली तर तुम्ही काही वर्षांनी करोडपती होऊ शकतात आणि आज आपण हे कसं शक्य आहे याच बाबत माहिती पाहणार आहोत. 

करोडपती होण्यासाठी किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल ? 

एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या वयाच्या तिसाव्या वर्षी प्रति महिना 900 रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ही एस आय पी 70 वर्षे वयापर्यंत म्हणजेच सलग 40 वर्ष सुरू ठेवली तर त्याला त्याच्या उतार वयात एक कोटी पेक्षा जास्त निधी मिळणार आहे.

सद्यस्थितीला एसआयपी मधून गुंतवणूकदारांना 13 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतात. अर्थात हा अपेक्षित वार्षिक रिटर्न अंदाजित आहे पण साधारणता गुंतवणूकदारांना 13-14 टक्क्यांनी रिटर्न सहज मिळतात.

त्यानुसार 40 वर्षांच्या गुंतवणुकीतुन गुंतवणूकदारांना 1.17 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 900 रुपयांची एसआयपी सुरू केल्यास चाळीस वर्षांच्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला एक कोटी 17 लाख 4 हजार 537 रुपयांचा मोठा फंड मिळू शकतो.

महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक फक्त 4.32 लाख रुपये राहणार आहे. अर्थात गुंतवणूकदाराला एक कोटी बारा लाख 72 हजार 537 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News