Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. ययोजनेची सुरुवात 2019 मध्ये झालीये. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते.
दरम्यान आता याच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. Pm Kisan च्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण वीस हप्ते मिळाले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांना याचे 21प्ते मिळाले आहे. देशातील चार पूरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचे 21 हप्ते देण्यात आले आहे.

हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचे 21 हफ्ते मिळाले आहेत. यामुळे बाकी राज्यांमधील शेतकऱ्यांना 21 वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न विचारला जातोय. या योजनेचा विसावा हप्ता 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
दरम्यान देशातील चार राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा 21 वा हफ्ता मिळाल्यानंतर दिवाळीच्या आधीच सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळेल अशी आशा होती. पण आता हा हप्ता लांबणीवर पडणार असे संकेत मिळू लागले आहेत.
कालपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे आणि यामुळे आता दिवाळीनंतरच देशातील उर्वरित राज्यांमधील शेतकऱ्यांना पीएम किसान चा पुढील हप्ता मिळणार असे स्पष्ट होत आहे. कदाचित पीएम किसान चा हप्ता नोव्हेंबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
परंतु या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र शेतकऱ्यांना केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्थात जे शेतकरी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी
केंद्र सरकारने पूरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21 वा हप्ता दिवाळीच्या आधी दिला. खरेतर, महाराष्ट्रात देखील पूरस्थिती तयार झाली होती आणि यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान सुद्धा झाले. पिकांसमवेतच शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडून निघाल्यात. पण तरीही केंद्रातील सरकारने या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून पी एम किसान चा 21 वा हप्ता वितरित केला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात तीव्र असंतोष पाहायला मिळतोय. या धोरणामुळे सरकार फक्त संधीसाधू राजकारण करण्यात पटाईत असल्याचा आरोपही होतोय.