Pune News : जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या धरणावर आठ पदरी पूल तयार केला जाणार आहे. धरणाच्या पाण्यावर बांधला जाणारा हा पूल दोन प्रमुख गावांना कनेक्ट करणार असून यामुळे तब्बल 82 गावांमधील नागरिकांचा फायदा होणार आहे.
खरे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प उभारला जात असून आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.

महामंडळाकडून पुणे रिंग रोड ग्रीन कॉरिडोर म्हणून विकसित केला जाणार आहे. यासाठी पाच लाख नवीन झाडांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच हजारो झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. यासोबतच रिंग रोड लगत सौरऊर्जेचा प्रकल्प सुद्धा विकसित केला जाईल अशी माहिती समोर येत आहे.
तसेच या प्रकल्प अंतर्गत पुण्यातील एका महत्त्वाच्या धरणावर आठ पदरी पूल तयार केला जाणार आहे. पुणे रिंग रोड चे काम पूर्व आणि पश्चिम भागात विभागले गेले आहे. यातील पश्चिम भागातील रस्ता खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जाणार आहे.
दरम्यान याच ठिकाणी महामंडळाकडून आठ पदरी उड्डाणपुल विकसित केला जाणार आहे. सांगरुण आणि मालखेड या गावांना जोडण्यासाठी हा ब्रिज तयार केला जाईल. याची लांबी 650 मीटर राहील आणि हा आठ पदरी राहणार आहे. या पुलाच्या खांबांमध्ये 40 ते 60 मीटर चे अंतर राहणार आहे.
याचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू झाल्या असून नियोजित वेळेत काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होतोय. या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी पाईल फाउंडेशन या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. या उड्डाणपुलासाठी धरणाच्या पाण्यातच खड्डे खोदले जाणार आहेत.
या पुलासाठी एकूण 273 खड्डे खोदले जातील. त्यापैकी 156 खड्डे जमिनीवर आणि उर्वरित खड्डे पाण्यात राहतील. पुणे रिंग रोड 6 तालुक्यांमधील 82 गावातून प्रस्तावित करण्यात आला आहे.
यासाठी 55,622 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येईल. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे. या प्रकल्पाचे काम पुढील वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आतात्यामुळे आता