केंद्रीय कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली गुड न्यूज ! ‘या’ तारखेला Pm Kisan चा 21 वा हफ्ता जमा होणार, नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार

Published on -

Pm Kisan Yojana : केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जातात. यातील असंख्य योजनांच्या माध्यमातून विविध बाबींसाठी शासनाकडून अनुदान पुरवले जाते. तर काही अशा योजना आहेत ज्या की शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतात.

केंद्राची पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अशाच योजना आहेत. पी एम किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वाटप केले जाते.

प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली आहे आणि आत्तापर्यंत या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण वीस हप्ते मिळाले आहेत. यामुळे आता शेतकरी बांधव या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासनाकडून दिवाळीच्या आधीच या योजनेचा पैसा मिळेल अशी आशा होती. पण आज धनत्रयोदशीचा दिवस उजाडला तरीही सरकारने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेला नाही.

यामुळे आता दिवाळीनंतरच या योजनेचा लाभ मिळणार हे फिक्स झाले आहे. स्वतः कृषी विभागाने या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत या योजनेचा पैसा जमा होणार याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत.

वास्तविक सरकारकडून काही राज्यांमधील शेतकऱ्यांना 21 वा हप्ता देण्यात आला आहे. पूरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळाला आहे. 21वा हफ्ता पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना आधीच देण्यात आलाय.

तेथील पूरस्थिती पाहता सरकारने हा निर्णय घेतला होता. खरे तर महाराष्ट्रात पण तशीच स्थिती होती. पण राज्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी पाहायला मिळत आहे. पण आता केंद्राच्या कृषी विभागाकडून या योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.

कृषी विभागाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसानच्या 21 व्या हफ्त्याची तारीख जाहीर केली जाणार असे सांगितले आहे. अर्थात पुढील हप्ता दिवाळीनंतरच येणार आहे. कृषी विभागाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तारीख जाहीर केली जाणार असे संकेत दिले आहेत यामुळे 1 – 5 नोव्हेंबरपर्यंत या योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News