Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान, आज आपण अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न मिळणार आहेत. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या RD योजनेत सुद्धा गुंतवणूक दारांना चांगले व्याज दिले जाते.
अशा परिस्थितीत जर तुम्ही या दिवाळीत तुमच्या घरातील महिलांच्या नावे गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही या योजनेचा विचार करायला काही हरकत नाही. यात पत्नीच्या नावे गुंतवणूक करून तुम्हाला लाखो रुपयांचा फंड जमा करता येणार आहे.

कशी आहे RD योजना ?
तुम्हाला या दिवाळीत तुमच्या पत्नीच्या नावाने सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही आरडी योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्टाची आरडी योजना पाच वर्षाची आहे. ही योजना प्रत्येक महिन्याला छोटी गुंतवणूक जमा करून मोठा फंड तयार करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कामाची ठरणार आहे.
ही योजना पोस्ट ऑफिस तसेच देशातील इतर अन्य बँकाच्या माध्यमातूनही राबवली जात आहे. पोस्टाच्या आरडी योजनेत सद्यस्थितीला 6.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या योजनेचा लॉक इन पिरेड पाच वर्षांचा आहे. आता आपण आरडी योजनेत दरमहा 8000 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार याची माहिती पाहूयात.
लाखोंचा फंड तयार होणार
पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दर महिन्याला आठ हजार रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी म्हणजेच पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 5 लाख 70 हजार 927 रुपये मिळणार आहेत. यात गुंतवणूकदाराची गुंतवणूक चार लाख 80 हजार रुपयांची राहणार आहे.
म्हणजेच 8000 रुपयांच्या गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना पाच वर्षांनी 90 हजार 927 रुपयांचे व्याज मिळणार आहे. नक्कीच ज्यांना एकरकमी गुंतवणूक करता येणे अशक्य आहे त्यांच्यासाठी ही योजना एक फायदेशीर पर्याय ठरणार आहे.