Banking News : दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरात आनंदाचे वातावरण आहे. दोन दिवसांपासून दिवाळीचा सण सुरू झाला आहे आणि जवळपास 23 तारखेपर्यंत दिवाळीचा सण साजरा केला जाईल. 23 तारखेला भाऊबीज आणि त्यानंतर मग दीपोत्सव संपणार आहे. दरम्यान दिवाळीच्या काळात देशभरातील बँकांना अनेक दिवस सुट्ट्या जाहीर केल्या जातात.
महाराष्ट्रात देखील बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असतात. अशा परिस्थितीत आज आपण दीपोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील बँकांना सलग किती दिवसांसाठी सुट्ट्या राहणार ? याबाबतची डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दिवाळी निमित्ताने ऑक्टोबर महिन्यात बँकांना सर्वाधिक सुट्ट्या आहेत.

19 ऑक्टोबर – आज रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
20 ऑक्टोबर – दीपावली नरक चतुर्दशी आणि काली पूजा निमित्ताने देशभरातील अनेक राज्यांमध्ये या दिवशी बँकांना सुट्ट्या राहतील. महाराष्ट्रात सुद्धा नरक चतुर्दशी निमित्ताने या दिवशी सुट्टी राहणार आहे.
21 ऑक्टोबर – लक्ष्मीपूजन, दिवाळी अमावस्या आणि गोवर्धन पूजा यानिमित्ताने अनेक राज्यांमध्ये या दिवशी बँका बंद राहतील. महाराष्ट्रात सुद्धा बँकेला सुट्टी राहणार आहे.
22 ऑक्टोबर – बलिप्रतिपदा, लक्ष्मी पूजा या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी बँकांना सुट्टी राहणार आहे. इतरही काही राज्यांमध्ये सुट्टी दिली जाणार आहे.
23 ऑक्टोबर – भाऊबीज असल्याकारणाने या दिवशी अनेक राज्यांमधील बँकांना सुट्टी राहील. भाऊबीज निमित्ताने महाराष्ट्रातील बँका बंद राहतील. सोबतच चित्रगुप्त जयंती आणि निंगोळ चकोबा निमित्ताने काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
बँका बंद राहिल्यास ऑनलाईन बँकिंगचा पर्याय परवडणार
दिवाळीच्या काळात अनेकांना पैशांची गरज भासणार आहे. अशा स्थितीत बँका बंद राहिल्यास सर्वसामान्यांची अडचण होऊ शकते. पण त्याचवेळी ऑनलाइन बँकिंगचा पर्याय ग्राहकांसाठी उपयोगाचा ठरेल. एटीएम सेवा, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना पैशांचे व्यवहार करता येणार आहेत.