पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मिळणार 40 लाखांचे रिटर्न! 

Published on -

Post Office Scheme : तुम्हालाही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टात गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरेतर, या वर्षात आरबीआयच्या माध्यमातून रेपोरेट मध्ये एक टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरबीआयच्या रेपो रेट कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांनी फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी केले आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांना आता इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागतो.

तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी इतर पर्यायांच्या शोधात असाल तर नक्कीच आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेची माहिती पाहणार आहोत.

पोस्ट ऑफिस कडून सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी योजना चालवल्या जातात आणि या सर्व योजना जोखीममुक्त असतात. पोस्टाच्या योजनांमधून गुंतवणूकदारांना एक निश्चित आणि सुरक्षित परतावा मिळत असल्याने अनेकजण येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. 

कशी आहे PPF योजना?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना पंधरा वर्षांची आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने व्याज दिले जात आहे. ही एक गव्हर्मेंट सेविंग स्कीम असून या योजनेसाठी तुम्हाला पोस्टात तसेच बँकांमध्ये अकाउंट ओपन करता येते.

या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगले मिळत नव्हते शिवाय ही योजना पूर्णपणे करमुक्त सुद्धा आहे. या योजनेत गुंतवलेली रक्कम, रकमेवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम सर्वकाही करमुक्त आहे.

यामुळे ही योजना टॅक्स सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरणार आहे. लॉंग टर्म मध्ये मोठा फंड तयार करायचा असल्यास ही योजना फायद्याची ठरू शकते.

या योजनेत वार्षिक किमान पाचशे रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.  

कसे मिळणार 40 लाख

पब्लिक प्रॉव्हिड अँड फंड योजनेत प्रत्येक महिन्याला 12 हजार 500 रुपये आता वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांनी 40 लाख 68 हजार 209 रुपये मिळणार आहेत.

यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये एवढी राहील आणि उर्वरित 18 लाख 18 हजार 209 रुपये गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe