देशातील ‘या’ बँका देणार सर्वात स्वस्त Home Loan ! 50 लाखांच्या कर्जासाठी कितीचा हप्ता ?

Published on -

Home Loan : दिवाळीत अनेक जण शुभ कार्य हाती घेत असतात. नवीन वाहन तसेच घर खरेदीसाठी देखील दिवाळीचा मुहूर्त काढला जातो.

अशा स्थितीत जर तुम्हीही येत्या दिवाळीत नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.

आज आपण देशातील सर्वात स्वस्त होम लोन देणाऱ्या सरकारी व खाजगी बँकांची माहिती जाणून घेणार आहोत. यावर्षी आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षी आत्तापर्यंत रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात करण्यात आली असून याचा परिणाम म्हणून होम लोनसहीत सर्वच प्रकारच्या कर्जांचे व्याजदर कमी झाले आहेत.

याशिवाय बँका आणि वित्तीय संस्था होम लोनवर आकर्षक ऑफर देऊ करत आहेत. देशातील टॉप सरकारी आणि खाजगी बँका आपल्या ग्राहकांना 50 लाख रुपयांचे होम लोन 7.3% ते 9% व्याजदराने उपलब्ध करून देत आहेत.

मात्र बँकांचे व्याजदर हे तुमचे मासिक उत्पन्न, तुमची नोकरी सिबिल स्कोर अशा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात. साधारणता 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना बँकांकडून कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

आता आम्ही तुम्हाला देशातील सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या काही सरकारी आणि खाजगी बँकांची माहिती सांगणार आहोत. 

बँकव्याजदर50 लाख 20 वर्षांसाठी घेतल्यास EMI
स्टेट बँक ऑफ इंडिया7.5%40,280
पंजाब नॅशनल बँक 7.5%40,280
बँक ऑफ बडोदा7.45%40,127
युनियन बँक ऑफ इंडिया7.30%39,670
कॅनरा बँक7.30%39,670
अ‍ॅक्सिस बँक8.35%42 हजार 918 
कोटक महिंद्रा बँक7.99%41 हजार 791 
HDFC बँक7.90%41 हजार 511 
ICICI बँक7.70%40,893 
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe