Snake Viral News : तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा ठरणार आहे. खरे तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका अधिक वाढत असतो. दरम्यान महाराष्ट्रातून मान्सूनची एक्झिट झाली आहे. त्यामुळे सापांचा धोका टळला अस वाटतय.
पण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सापांचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सापांना काही गोष्टींचे विशेष आकर्षण असते.

आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे साप आकर्षित होण्याची शक्यता असते आणि यामुळे सापांचा धोका वाढतो. दरम्यान आज आपण अशाच गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत.
या गोष्टी जर तुमच्याही घरात असतील किंवा घराच्या आजूबाजूला असतील तर तुम्ही विशेष सावध राहायला पाहिजे आणि या गोष्टी तात्काळ घराबाहेर लांब फेकायला हव्यात जेणेकरून सापांचा धोका टाळता येणार आहे.
या गोष्टींकडे साप आकर्षित होतो
अंड्यांचा वास – सापाला कोंबडीचे तसेच कोणत्याही पक्षाचे अंडे खायला आवडते. यामुळे जर तुमच्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला सापांचे किंवा कोंबड्यांचे अंडे असतील तर याचा गंध सापाला आपल्याकडे आकर्षित करतो.
अंड्यांचा वास सापाला आकर्षित करत असल्याने जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला अंडी किंवा अंडीची टरफले असतील तर तुम्ही ती दूर ठेवायला हवीत. अंडी सहसा फ्रीजमध्येच ठेवायला हवीत. फ्रीजमध्ये अंडी असल्यास त्यांचा वास बाहेर येणार नाहीत आणि साप आकर्षित होणार नाहीत.
सडलेला कचरा तसेच खत – सापाला सडलेला कचरा किंवा खतांचा वास आकर्षित करू शकतो. यामुळे तुम्ही ज्या भागात राहता तिथे जर उकिरडा असेल किंवा सडलेला कचरा, खत असेल तर ते तात्काळ साफ करायला हवे आणि जागा अगदीच स्वच्छ ठेवायला हवी जेणेकरून सापांचा धोका कमी होईल.
उंदीर – उंदीर हे सापाचे आवडत अन्न आहे. अनेकदा साप आपल्या अन्नाच्या शोधात जिथे उंदीर असतो तिथे पोहोचतो. यामुळे उंदराची विष्ठा किंवा लघवीचा वास जर घरातून येत असेल तर अशा ठिकाणी साप येण्याची भीती असते.
यामुळे जर तुमच्या घरात उंदरांचा उपद्रव असेल तर तुम्ही तुमचे घर पहिल्यांदाच स्वच्छ करायला हवे जेणेकरून उंदरांच्या मलमूत्राचा वास येणार नाही आणि सापांचा धोका कमी होईल.