लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! फडणवीस सरकार लवकरच लाडक्या बहिणींची ‘ही’ मागणी मान्य करणार

Published on -

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली असून या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. गेल्या वर्षी या योजनेची सुरुवात झाली असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 15 हप्ते मिळाले आहेत.

लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी मिळाला आहे आणि येत्या काही दिवसांनी त्यांना ऑक्टोबर महिन्याचा सुद्धा लाभ दिला जाऊ शकतो असे संकेत मिळत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज दिली जाणार असे वक्तव्य केले होते यामुळे भाऊबीजच्या दिवशी किंवा त्यानंतर लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार असल्याचा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत.

दुसरीकडे लाडक्या बहिणींसाठी केवायसी ची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. केवायसी केली नाही तर लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. केवायसी च्या प्रक्रियेसाठी सरकारकडून लाडक्या बहिणींना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

तसेच पुरस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना अतिरिक्त पंधरा दिवसांची मुदत देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. एवढेच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवायसीच्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती मिळाली असल्याचीही माहिती समोर येत आहे.

नक्कीचं सरकारने केवायसीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली असेल तर महिलांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे. अशातच आता मध्य प्रदेश राज्य शासनाने तेथील लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ देण्याची मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना देखील आम्ही 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीने निवडणूकीच्या काळात दिले होते यामुळे राज्यातील महिलांना कधीपासून 2100 चा लाभ मिळणारा असा प्रश्न आता महिलांकडून उपस्थित होतोय. अशातच आता 2100 रुपयांच्या लाभाबाबत महायुती मधील मंत्री नरहर झिरवाळ यांनी मोठी माहिती दिली आहे.

मंत्री नरहर झिरवाळ यांनी या योजनेविषयी मोठे संकेत देताना गरज पडल्यास लाभार्थी महिलांच्या सन्मानिधीत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल, असं वक्तव्य केलं आहे. यामुळे येत्या काही दिवसांनी राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळू शकतो अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News