Share Market News : तुम्हीही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता का अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. ही बातमी बोनस शेअर्स तसेच डिव्हीडंट किंवा मग स्टॉक स्प्लिट सारख्या कॉर्पोरेट लाभ देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करणाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत.
भू राजकीय तणाव अमेरिकेचे कर धोरण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेअर मार्केट दबावात आहे. परंतु अशा या परिस्थितीत देखील काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्मॉलकॅप कंपनी सिक्को इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली आहे.

गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये २०% अप्पर सर्किट लागले होते आणि हा स्टॉक १२४.२० रुपयांवर पोहोचला. सिक्को इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी आता ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या ३ दिवसांत सिक्को इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये २७% पेक्षा जास्त वाढ दिसून आली आहे.
याचे कारण म्हणजे कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला बोनस शेअर्सची भेट देणार आहे सोबतच स्टॉक स्प्लिट सुद्धा करणार आहे. यामुळे कंपनीकडून आपल्या शेअर होल्डर्सला डबल बोनस दिला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि म्हणून कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत.
दरम्यान या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट जारी करण्यास मंजुरी देण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार आता ही स्मॉल कॅप कंपनी १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देईल.
याचा अर्थ असा की कंपनी प्रत्येक एका शेअरवर एक बोनस शेअर देईल. शिवाय, सिक्को इंडस्ट्रीजच्या बोर्डाने १:१० च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. अर्थात कंपनी त्यांचे शेअर्स १० शेअर्समध्ये विभाजित करेल.
सिक्को इंडस्ट्रीज त्यांचे १० रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स १ रुपये दर्शनी मूल्य असलेले १० शेअर्समध्ये विभाजित करेल. स्मॉल-कॅप कंपनीने अद्याप बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.
गेल्या महिन्यात सिक्को इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ८२% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. २३ सप्टेंबर २०२५ रोजी या स्मॉल-कॅप कंपनीचे शेअर्स ६७.७७ रुपये होते. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स १२४.२० रुपयांवर पोहोचले. गेल्या चार वर्षांत, सिक्को इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ३८५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
या काळात कंपनीचे शेअर्स २५.४६ रुपयांवरून १२४ रुपयांवर पोहोचले आहेत. सिक्को इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२४.२० रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांक ६०.६५ रुपये आहे. गुरुवारी कंपनीचे मार्केट कॅप २७१ कोटी रुपयांच्या पुढे गेले.