Banking News : बँकिंग सेक्टरमध्ये लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. हा बदल बँक ग्राहकांसाठी मोठा दिलासाचा राहणार असून या बदलाचा सर्वाधिक लाभ बँक ग्राहकांनाच होणार आहे. यामुळे जर तुमचे हे एसबीआय एचडीएफसी सह देशातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी.
बँक ग्राहकांसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार नोव्हेंबर पासून आपल्याला बँकिंग व्यवस्थेत एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. हा बदल सर्वांसाठीच सकारात्मक राहणार आहे.

वित्त मंत्रालयाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता खातेधारक त्यांच्या खात्याला एक नाही तर थेट चार व्यक्तींना नामांकित करू शकतील. आधी पण ग्राहकांना बँक खात्याला नॉमिनी लावता येत होते परंतु नॉमिनी लावण्याची लिमिट कमी होती.
पण आता ही लिमिट थेट चार पर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या खात्याला 4 नॉमिनी लावू शकता. अर्थ मंत्रालयाने या नवीन प्रणालीची घोषणा केली आहे. यावेळी अर्थ मंत्रालयाकडून दावे निकाली काढण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक, न्याय्य आणि प्रभावी बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
तसेच हा नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात लागू होईल अशी महत्त्वाची माहिती पण दिली. अर्थ मंत्रालयाच्या मते, या सुधारणांमुळे बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यांसाठी एकाच वेळी किंवा अनुक्रमे चार व्यक्तींना नॉमिनी करण्यास परवानगी मिळणार आहे.
यामुळे खातेधारक तसेच त्यांच्या कायदेशीर वारसांना दाव्याचे निराकरण करणे सोपे होईल. खाते नामांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी, ग्राहक प्रत्येक नामांकित व्यक्तीचा वाटा किंवा टक्केवारी सुद्धा ठरवू शकतील.
याचा फायदा असा होईल की एकूण हिस्सा 100 टक्के राहील आणि कोणतेही संभाव्य वाद दूर होतील. बँक तिजोरी आणि लॉकर्ससाठी फक्त क्रमिक नामांकनांना परवानगी आहे. याचा अर्थ असा की एका नॉमिनीच्या मृत्यूनंतर पुढील नॉमिनी व्यक्तीला ती जबाबदारी मिळणार आहे.
म्हणजे या प्रकरणात एकाच वेळी सर्व नॉमिनी व्यक्तीला जबाबदारी मिळणार नाही. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, या तरतुदी बँक ठेवीदारांना त्यांच्या पसंतीच्या व्यक्ती नॉमिनी निवडण्याची मुभा देणाऱ्या राहणार आहेत.