Dmart Offers : दिवाळी नुकतीच संपली. पण दिवाळी संपली असली तरी खरेदीचा उत्साह मात्र अजूनही कायम आहे. ग्राहकांसाठी डीमार्टने जबरदस्त सेलची घोषणा केली आहे. डी मार्ट स्पेशल डिस्काउंट सेल अंतर्गत ग्राहकांना विविध वस्तूंवर 15 टक्के ते 40 टक्के पर्यंत सूट दिला जात आहे. या सेलमध्ये घरगुती वस्तू, किराणा माल, पर्सनल केअर, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, बेबी केयर आणि पाळीव प्राण्यांच्या वस्तू यावर विशेष ऑफर मिळत आहे.
किराणा मालावर तांदूळ, डाळ, तेल, मैदा, साखर आदि वस्तूंवर 15%सूट, दुग्धजन्य व पेय पदार्थावर दहा टक्के पर्यंत बचत, फ्लोअर क्लीनर व डिटर्जंट वर 30% ते 40% सूट तसेच शाम्पू क्रीम लोशन, आणि सॅनिटरी पॅड वर 20 टक्के पर्यंत सवलत मिळणार आहे. बेबी केअर प्रॉडक्ट डायपर आणि बेबी फुटबॉल अशा वस्तू 20% कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत.

शिवाय, पाळीव प्राण्यांच्या वस्तू डॉग फूड आणि कॅट फूड वर पंधरा टक्के सूट, इलेक्ट्रॉनिक आयटम्स मिक्सर फॅन लाइट्सवर 25%पर्यंत सूट तसेच डीमार्टचे प्रायव्हेट लेवल प्रॉडक्टवर नेहमीपेक्षा अधिक कॅशबॅक ऑफर्स मिळतील. हा सेल 31ऑक्टोबर पर्यंत चालणार असून ग्राहकांना ‘डीमार्ट रेडी ॲप’ किंवा वेबसाईटवरून देखील खरेदी करता येणार आहे. खरेदीवर फ्री डिलिव्हरी सुविधा मिळणार आहे. पिन कोड टाकून डिलिव्हरी स्पॉट निवडा आणि फ्री डिलिव्हरीचा लाभ घ्या.
डीमार्टने दिलेल्या माहितीनुसार काही वस्तूंवर सात दिवसांची रिटर्न पॉलिसी देखील लागू असेल त्यामुळे या सेलमध्ये खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. डी मार्टच्या स्वतःच्या लेवल वरील वस्तू नेहमीच स्वस्त असतात मात्र असेल दरम्यान त्यावर अधिक कॅशबॅक आणि डिस्काउंट मिळत आहे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या वस्तू आणखी स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
डी मार्ट ने स्पष्ट केलं आहे की या ऑफर्स 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत लागू असतील म्हणून खरेदीची योजना करत असाल तर विलंब न करता जवळच्या डी मार्ट स्टोर ला भेट द्या किंवा ऑनलाईन ऑफर लॉगिन करून ऑर्डर करा.डी मार्टच्या ऑफर्स नेहमीच आकर्षक असतात परंतु यावर्षीच्या सेलमध्ये वस्तूंचा साठा मोठा असल्याने ग्राहकांना अधिक पर्यायाने किफायतिशील दर मिळत आहेत
अनेक ग्राहक सोशल मीडियावर हा सेल म्हणजे खरेदीचा सण असल्याचे म्हणत आहेत. दिवाळीच्या नंतर डीमार्टने दिलेला सुरु केलेला मोठा सेल ग्राहकांसाठी बचतीचा आणि आनंदाचा दुहेरी मेजवानी ठरणार आहे. घरगुती वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पर्यंत सर्व वस्तू एकाच छताखाली तेही पडणाऱ्या दरात मिळत असल्याने डीमार्ट पुन्हा एकदा ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे.













