Mumbai Railway : मुंबईतील नागरिकांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. भारतीय रेल्वेने मुंबई- बंगळूर दरम्यान आणखी एक नवी सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रस्तावाला नुकतीच मंजूर मिळाली आहे. सध्या दोन्ही शहरांदरम्यान उद्यान एक्सप्रेस धावत आहे.
‘मात्र आता नव्या सुपरफास्ट ट्रेनच्या मंजुरीमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद सेवा मिळणार आहे. मागील तीन दशकापासून म्हणजे 30 वर्षांपासून या ट्रेनची मागणी होत होती. अखेर आता रेल्वे मंत्रालयाने याला मंजुरी दिली असून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वतः जोशी यांनी सोशल मीडियावर या निर्णयाची माहिती दिली पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

जोशी यांनी सांगितले की, मुंबई – बंगळूर या दोन महानगरांना थेट जोडणारी आणखी एक सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्याची आमची दीर्घ काळापासून मागणी होती. अखेर ती पूर्ण झाली असून लाखो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. नवी मुंबई- बंगळूर सुपरफास्ट ट्रेन कर्नाटकातील हुबळी- धारावाड मार्ग धावणार आहे.
या ट्रेनचे प्रमुख थांबे पुढीलप्रमाणे असतील- बंगळूर, तुमकूर, दावाणगेरे, हावेरी, हुबळी, धारवाड, बेळगाव या मार्गानंतर ट्रेन महाराष्ट्रातील स्थानकावरून मुंबईकडे येईल महाराष्ट्रातील अचूक थांबे अद्याप जाहीर झालेले नाहीत. सध्या उद्यान एक्सप्रेस ही गाडी बंगळूर – गुंटकल- सोलापूर मार्ग चालवली जात आहे.
या ट्रेनचे दोन्ही शहरांमधील 1533 किमी अंतर 23 तासात पूर्ण होते आणि मार्गावर तब्बल 31 तांबे आहेत. नव्या सुपरफास्ट ट्रेन मुळे या प्रवासात मोठी बचत होईल आणि प्रवाशांना वेळेत जलद आणि सोयीस्कर प्रवास अनुभवायला मिळेल. या नव्या सुपरफास्ट ट्रेनमुळे मुंबई आणि बंगळूर या दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखद होणार आहे.
तसेच या मार्गावरील हुबळी- धारावाड, बेळगाव, दावणगिरी आणि हावेरी येथील प्रवाशांना थेट मुंबईची जोडणी मिळणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रदेशातील व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक संपर्कात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रेल्वे विभागाकडून अधिकृत वेळापत्रक आणि सुरुवातीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही
मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही ट्रेन 2026च्या सुरुवातीस प्रवर्गासाठी सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई- बंगळूर दरम्यान ही नवी सुपरफास्ट ट्रेन सुरू झाल्यानंतर दोन्ही महानगरातील संपर्क अधिक बळकट होईल. रेल्वे मंत्रालयाचे निर्णयाने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या नव्या मार्गामुळे आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवा वेग मिळेल.













