पाचवी आणि आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी !

Published on -

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांचे शिक्षक अन पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप परीक्षांचे वेळापत्रक समोर आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. सदर वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. पण यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर 15 डिसेंबर पर्यंत लेट फी भरून विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील.

त्यानंतर 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान अतिविलंब शुल्क देऊन अर्ज सादर करता येतील. त्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत अतिविशेष विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. मात्र, अधिकचे परीक्षा शुल्क भरायचे नसेल तर विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

तसेच जर काही कारणास्तव विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करता आले नाहीत तर तर त्यांचे अर्ज कुठल्याही सबबीवर स्वीकारले जाणार नाहीत. या वर्षी शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या रचनेत महत्त्वाचा बदल केला आहे.

2016 पासून ही परीक्षा पाचवी आणि आठवीसाठी घेतली जात होती. त्याआधीही परीक्षा चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी घेतली जायची. पण शिक्षण विभागाने 2016 पासून पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी स्कॉलरशिपची परीक्षा बंधनकारक केली.

मात्र, आता ती पुन्हा जुन्या पद्धतीप्रमाणे चौथी आणि सातवी या वर्गांसाठी घेण्याचा निर्णय झाला आहे. विशेष बाब म्हणून या शैक्षणिक वर्षात इतिहासात पहिल्यांदाचं चार वर्गांसाठी स्कॉलरशिप परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी या चारही वर्गांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, शिष्यवृत्ती परीक्षेत दोन सत्रं असतील. पहिल्या सत्रात प्रथम भाषा आणि गणित, तर दुसऱ्या सत्रात तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांच्या परीक्षा होतील.

प्रथम आणि तृतीय भाषा प्रत्येकी 50 गुणांसाठी, तर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रत्येकी 100 गुणांसाठी घेण्यात येतील. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जासाठी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक अथवा नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे बँक खाते तपशील ऑनलाइन भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निधीतून अर्ज भरणाऱ्या शाळांनी शुल्काची रक्कम 31 डिसेंबरपूर्वी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News