SBI Atm Rule : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. आरबीआयने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवले आहे. एसबीआय मध्ये अनेकांचे बँक अकाउंट आहे. दरम्यान जर तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे.
आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधून एका दिवसात किती पैसे काढता येऊ शकतात याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे डेबिट कार्ड देते. एटीएम कार्डच्या प्रकारानुसार एटीएम मधून पैसे काढण्याची लिमिट सेट करण्यात आलेली आहे.

खरे तर अनेकांना एटीएम मधून एका दिवसात किती पैसे निघतात याची माहिती नसते. एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा माहिती नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे आता आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादाबाबत माहिती घेऊन आलो आहोत.
वेगवेगळ्या डेबिट कार्डसाठी वेगवेगळी मर्यादा
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे डेबिट कार्ड पुरवत आहे. या प्रत्येक डेबिट कार्डची कॅश काढण्याची मर्यादा वेगळी आहे. ज्या ग्राहकांकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे बेसिक डेबिट कार्ड आहे त्यांना दररोज 40 हजार रुपयांपर्यंतची रक्कम एटीएम मधून काढता येऊ शकते. तसेच प्रीमियम किंवा आंतरराष्ट्रीय कार्ड धारकांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम एटीएम मधून काढता येऊ शकते.
कशी आहे डेबिट कार्डची मर्यादा?
Classic / Global Visa Debit Card – 40,000 रुपये प्रति दिवस
Platinum Debit Card – 1,00,000 रुपये प्रति दिवस
Gold International – 50,000 रुपये प्रति दिवस
MasterCard Classic Card – 25,000 रुपये प्रति दिवस
महत्त्वाची बाब म्हणजे POS (खरेदी) ट्रान्झॅक्शनसाठीही स्वतंत्र मर्यादा ठरवण्यात आली असते. उदाहरणार्थ प्लॅटिनम कार्डसाठी POS लिमिट 2 लाख पर्यंत सेट करण्यात आली आहे. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी एक नवीन सुविधा आणली आहे.
आता एसबीआयच्या ग्राहकांना एटीएम मधून दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर ओटीपी द्यावा लागतो. ओटीपी वेरिफिकेशन सिस्टम मुळे ग्राहकांना आर्थिक सुरक्षितता लाभली आहे.













