शेअर मार्केटमधील ‘या’ स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास मिळणार 60% रिटर्न ! टॉप ब्रोकरेजचा सल्ला काय?

Published on -

Stock To Buy : तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. आज आपण अशा काही स्टॉक ची माहिती जाणून घेणार आहोत ज्यात गुंतवणूक केल्यास लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळणार आहेत.

चॉईस इन्स्टिट्यूशनल इक्विटीज, नुवामा ब्रोकरेज आणि मोतीलाल ओसवाल यांनी काही शेअर्स सुचवले आहेत जे की येत्या काळात गुंतवणूकदारांना 60% पर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात. आता आपण याच टॉप शेअर्स बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग – नुवामाने या शेअर्सला बाय रेटिंग दिली आहे. Sona BLW Precision Forging Ltd लॉंग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देणार असा दावा करण्यात आला आहे. सध्या हा स्टॉक 483 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करतोय. मात्र येत्या काळात या स्टॉक ची किंमत 550 रुपयांपर्यंत जाऊ शकते. अर्थात गुंतवणूकदारांना या शेअर्समधून 13% पर्यंत रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

जुबिलंट इनग्रेव्हिया – हा स्टॉक सध्या 677 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. पण नुवामाने यासाठी 910 रुपयांची टार्गेट प्राईस सेट केली आहे. या शेअर साठी नुवामाने बाय रेटिंग दिली आहे. हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 43 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो.

 सुप्रीम इंडस्ट्रीज – मोतीलाल ओसवालने या स्टॉकसाठी 4850 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सध्या या स्टॉक ची किंमत चार हजार रुपये आहे. म्हणजेच या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना येत्या काळात 21% पर्यंत चे रिटर्न मिळू शकतात.

टाटा स्टील – टाटा स्टील चा शेअर सध्या 176 रुपयांवर ट्रेड करतोय. पण मोतीलाल ओसवालने यासाठी 210 रुपयांची टार्गेट प्राईस सेट केली आहे. अर्थात येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 19% पर्यंत रिटर्न मिळतील असे अंदाज दिला आहे.

Zen Technologies – चॉईस इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने या स्टॉक साठी 2150 रुपयांची टार्गेट प्राईस सेट केली आहे. सध्या स्टॉक 1339 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करतोय. म्हणजेच येत्या काळात हा स्टॉक 60% पर्यंतचे रिटर्न देणार असा अंदाज आहे. नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणात या स्टॉकची किंमत वाढली तर याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News