लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेपूर्वी मिळणार 2 हप्ते? 

Published on -

Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.

आतापर्यंत योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमधील हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता महिलांकडून या योजनेच्या पुढील हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. ऑक्टोबर चा महिना संपलाय पण अजून या महिन्याचा पैसा खात्यात वर्ग झाला नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये थोडीशी चिंता सुद्धा आहे.

अशातच आता लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांचे पडघम तर आत्तापासूनच वाजतायेत.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचे दोन हप्ते दिले जातील अशी माहिती एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल 15 नोव्हेंबरपूर्वी वाजणार अशी माहिती समोर आली आहे. याचं दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता सुद्धा लागणार आहे.

दरम्यान याच आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन कोटी लाभार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हप्ता देण्याचे नियोजन सुरू असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे फडणवीस सरकार याच आठवड्यात लाडक्या बहिणींना दोन हप्ते देण्याबाबत निर्णय घेणार असेही बोलले जात आहे.

नक्कीच आचारसंहितेच्या पूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळालेत तर त्यांच्यासाठी ही एक मोठी भेट राहणार आहे. खरे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींची नाराजी सरकारला महागात पडण्याची शक्यता आहे.

ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला शंभर टक्के मतदान केले आहे त्यांची नाराजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला जड भरण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे निवडणुकीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News