Dividend Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक कामाची अपडेट समोर आली आहे. हे अपडेट जे गुंतवणूकदार सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मधील कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत.
सोबतच कंपन्यांकडून आपल्या शेअर होल्डर्सला डीविडेंट आणि बोनस शेअरची सुद्धा भेट दिली जात आहे. अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स आणि डीविडेंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करण्यास उत्सुक असतात.

तुम्ही सुद्धा त्यातीलच एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे दोन सरकारी कंपन्यांनी आपल्या शेअर होल्डर्स ला डिवीडेंट देण्याची मोठी घोषणा केली असून यामुळे या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.
कोण देणार Dividend
टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि सरकारी पेट्रोलियम कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केलेत.
तिमाही निकाल जाहीर करतानाच कंपनीकडून यावेळी लाभांश देण्याचीही घोषणा करण्यात आली. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4.6% वाढून 76 कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत नफा 73 कोटी रुपये होता.
दरम्यान कंपनीने लाभांश देण्याची घोषणा केली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 10% लाभांश देण्याची घोषणा केली आहे म्हणजेच प्रति शेअर एक रुपयांचा लाभांश मिळणार आहे.
कंपनीने लाभांश साठी चार नोव्हेंबर रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. तसेच 25 नोव्हेंबर पासून लाभांश वाटप सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरी सरकारी कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) बाबत बोलायचं झालं तर या कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर पाच रुपयांचा अंतरीम लाभांश जाहीर केला आहे.
यासाठीची रेकॉर्ड डेट 6 नोव्हेंबर 2025 ठरवण्यात आली आहे. तसेच याचा लाभ 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत दिला जाणार अशी पण माहिती कंपनीच्या संचालक मंडळाकडून समोर आली आहे. यामुळे जे गुंतवणूकदार लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करू इच्छित असतील त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.













