Maruti Suzuki Victoris चे टॉप मॉडेल EMI वर खरेदी करण्यासाठी किती रुपये डाऊनपेमेंट करावे लागणार? वाचा सविस्तर

Published on -

Maruti Suzuki Victoris EMI Plan : मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक आणि कार विक्री करणारी कंपनी आहे. भारतात सगळीकडे ही गाडी तुम्हाला नजरेस पडेल. या कंपनीच्या अनेक लोकप्रिय गाड्या आहेत. कंपनी आता इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये देखील विस्तार करण्याचा प्लॅन बनवत आहे.

हेच कारण आहे की जेव्हा कार खरेदी करण्याचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोक मारुती सुझुकीचा विचार करतात. हा ब्रँड वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी कार उपलब्ध करून देत आहे.

दरम्यान जर तुम्हाला नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करायची असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. विशेषता मारुती सुझुकीची गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरेल. खरंतर अलीकडेच कंपनीने त्यांची नवीन एसयूव्ही लाँच केली आहे.

मारुती सुझुकी व्हिक्टोरिस ही कंपनीचे अलीकडेच लॉन्च झालेली लोकप्रिय SUV. ही गाडी लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता जर तुम्ही प्रीमियम एसयूव्ही शोधत असाल, तर तुम्ही मारुती सुझुकी व्हिक्टोरिसचा विचार करू शकता.

दरम्यान आज आपण या गाडीचा ईएमआय प्लॅन घेऊन आलो आहोत. आज, आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी व्हिक्टोरिसच्या टॉप-एंड व्हेरियंटबद्दल सांगणार आहोत. आम्ही टॉप-एंड व्हेरियंटसाठी डाउन पेमेंट आणि ईएमआय बाबत सविस्तर माहिती देणार आहोत. 

कसे आहे संपूर्ण कॅल्क्युलेशन 

या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १०.५० लाख रुपये आहे. टॉप-स्पेक मारुती सुझुकी व्हिक्टोरिस प्रकाराची किंमत १९.९८ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. टॉप-स्पेक मारुती सुझुकी व्हिक्टोरिस प्रकाराला ZXI+ (O) म्हणतात.

जर तुम्ही ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर तुम्हाला नोंदणीसाठी २.१५ लाख आणि विम्यासाठी अंदाजे ८७,००० रुपये मोजावे लागतील. इतर शुल्कांसह या SUV ची किंमत दिल्लीत २३.२३ लाख (ऑन रोड प्राईस) राहणार आहे.

आता आपण या ऑन रोड प्राईस च्या आधारावर या गाडीसाठी  किती डाऊन पेमेंट करावे लागणार आणि कितीचा हप्ता असेल याबाबत माहिती पाहूयात. तुम्हाला या गाडीचे टॉप Varient ईएमआयवर घ्यायचे असेल आणि यासाठी तुम्ही पाच लाख रुपयांच डाऊन पेमेंट करणार असाल तर आपणास १८.२३ लाख रुपये फायनान्स करावे लागतील.

जर तुम्हाला बँकेकडून १० वर्षांच्या मुदतीसाठी ९ टक्के व्याजदराने हे कर्ज मिळाले तर तुम्हाला दरमहा २३,०९३ रुपये EMI म्हणून द्यावे लागतील. दरमहा २३,०९३ रुपये EMI भरल्यास तुम्ही बँकेला एकूण २७.७१ लाख रुपये द्याल. यामध्ये ९.४८ लाख रुपये व्याज असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News