Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने ही गाडी देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली.
महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर सद्यस्थितीला ही गाडी राज्यातील बारा महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. राज्यातील मुंबई पुणे सोलापूर नागपूर अशा अनेक महत्त्वाच्या शहरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे.

अशातच आता मुंबई पुणे सोलापूर या शहरांना कनेक्ट करणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. महाराष्ट्रातून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस ला दोन नवीन थांबे मंजूर करण्याचा मोठा निर्णय रेल्वे कडून घेण्यात आला असून या निर्णयामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या गाड्यांना मिळाला नवीन थांबा?
मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते हुबळी यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला एक अतिरिक्त थांबा मंजूर केला आहे. यासोबतच प्रशासनाने सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला देखील अतिरिक्त थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोन्ही गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर हे थांबे मंजूर करण्यात आले आहेत आणि यामुळे या वंदे भारतरत्न प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आता पुणे ते हुबळी या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला किर्लोस्करवाडी या महत्त्वाच्या स्थानकावर सुद्धा थांबा मंजूर करण्यात आला आहे.
किर्लोस्करवाडी या स्थानकावर थांबा मिळावा या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने रेल्वे कडे पाठपुरावा केला जात होता. अखेरकार आता प्रवाशांचा हा पाठपुरावा यशस्वी झाला असून किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर सुद्धा वंदे भारत ट्रेन थांबणार आहे.
दुसरीकडे सीएसएमटी सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन आता दौंड स्थानकावर सुद्धा थांबा घेणार आहे. दौंडला सीएसएमटी सोलापूर वंदे भारत ट्रेन थांबावी यासाठी रेल्वे कडे सतत निवेदने पाठवली जात होती. प्रशासनाने सुद्धा या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अस आश्वासन दिल होत.
यानुसार आता मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुणे ते हुबळी दरम्यान चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर तसेच सीएसएमटी सोलापूर वंदे भारत ट्रेनला दौंड स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.













