Share Market News : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर नक्कीच ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर आज तुळशी विवाह अर्थात आजपासून लग्नसराईचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे.
दरम्यान जर तुम्हाला हे येत्या काळात शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तुमच्यासाठी काही शेअर्स कमाईची सुवर्णसंधी घेऊन आले आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्या तिमाही निकाल जाहीर करत आहेत.

सोबतच कंपन्यांकडून बोनस शेअर्स आणि डिव्हीडंट देण्याचीही घोषणा केली जात आहे. कॉर्पोरेट लाभाच्या घोषणांमुळे सध्या शेअर मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही बोनस शेअर्स किंवा डिव्हिडन्ड देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर समोर आली आहे.
शेअर मार्केट मधील एक कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला एकाच वेळी दुहेरी गिफ्ट देणार आहे. आरोग्यसेवा देणारी कंपनी डॉ. लाल पथ लॅब्स आपल्या गुंतवणूकदारांना एकाच वेळी लाभांश आणि बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
महत्त्वाचे बाब म्हणजे ही कंपनी पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. दरम्यान आता आपण कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना किती बोनस शेअर्स देणार तसेच लाभांश किती देणार याबाबतची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
किती लाभांश मिळणार
कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांना सात रुपये अंतरिम लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. अर्थात या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या शेअर होल्डर्स ला सात रुपये प्रति शेअर असा अंतरिम लाभांश मिळणार आहे. खरे तर कंपनीने या आधी सुद्धा अंतरिम लाभांश दिलेला आहे.
कंपनीने 2026 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर सहा रुपयांचा पहिला अंतरिम लाभांश नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. आता कंपनी सात रुपयांचा लाभांश देणार आहे आणि यासाठीची रेकॉर्ड डेट 7 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लाभांश 30 दिवसांच्या आत दिला जाईल असेही कंपनीच्या संचालक मंडळाने स्पष्ट केले आहे.
किती बोनस शेअर मिळणार?
डॉ. लाल पथ लॅब्सने आपल्या गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. 1:1 या प्रमाणात कंपनीकडून बोनस शेअर्स मिळणार आहे.
म्हणजेच गुंतवणूकदारांना एका शेअर साठी एक शेअर बोनस म्हणून दिला जाणार आहे. परंतु अद्याप कंपनीने यासाठीची रेकॉर्ड डेट फायनल केलेली नाही. पण लवकरच कंपनीच्या संचालक मंडळाकडून बोनस इशू साठीची रेकॉर्ड फायनल होईल.













