Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक अविभाज्य भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना फार महत्त्व दिलं जातं. मुळांक, भाग्यांक, नामांक असे अनेक अंक अंकशास्त्रात महत्त्वाचे मानले जातात आणि या अंकांवरून व्यक्तीचे भविष्य, त्याचे वर्तमान काळ तसेच त्याचा भूतकाळ ओळखता येणे शक्य असल्याचा दावा केला जातो. यातील मूळांक हा कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेवरून काढला जातो.
जन्मतारखेची बेरीज म्हणजे मुळांक. समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या वीस तारखेला झालेला असेल तर त्याचा मूळांक 2+0 = 2 असेल. कारण की मुळात हा एक ते नऊ दरम्यानच असतो. म्हणजेच ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन तारखेला झालेला असेल त्याचा मूळ अंक दोनच राहील.

11 तारखेला झालेला असेल तर त्याच्या मूळ अंक 1+1 = 2 राहणार आहे. असं म्हणतात की, अंकशास्त्र मूळ संख्येचे वर्णन करते. प्रत्येक मुलांकांची स्वतःची विशिष्ट वैशिष्ट्ये असतात आणि त्याद्वारे, एखाद्या व्यक्तीचे गुण, व्यक्तिमत्व आणि भविष्य अशा अनेक गोष्टी निश्चित केल्या जाऊ शकतात.
आज आपण मुलांक 8 असलेल्या लोकांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. असे म्हणतात की हे लोक जन्मजात नशीबवान असतात. अशक्य गोष्टी सुद्धा या लोकांच्या इच्छाशक्तीमुळे शक्य होऊ शकतात. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा हाच मुळांक आहे आणि ते राजकारणात एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहेत.
ते एक ग्लोबल लीडर म्हणून उदयास आले आहेत. या लोकांवर शनीदेवाची विशेष कृपा असते. यामुळे या लोकांवर साडेसातीचा सुद्धा विशेष प्रभाव पाहायला मिळत नाही. याउलट चांगले कर्म केल्यास साडेसातीच्या काळात या लोकांना चांगले लाभ होण्याची शक्यता असते.
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ, 17 किंवा 26 तारखेला झालेला असेल त्या लोकांचा मूळांक आठ असतो. या लोकांचा स्वामीग्रह शनी समजला जातो. अर्थात शनि देवाची या लोकांवर फार कृपा असते. हे लोक फारच मेहनती आणि कर्मठ स्वभावाचे असतात.
या लोकांची अशी धारणा असते की यशस्वी होण्यासाठी कोणताचं शॉर्टकट नसतो फक्त मेहनत मेहनत आणि मेहनत हाच एकमेव पर्याय ते समजतात. यामुळे हे लोक आयुष्यात यशस्वी होतातच. असे मानले जाते की हे लोक जन्मजात नशीबवान असतात.
तरी सुद्धा काही लोकांना आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कठीण काळातून जावे लागते. सुरुवातीला संघर्ष करावा लागतो मात्र प्रामाणिक काम करत राहिले तर यश या लोकांच्या पायाशी लोटांगण घालते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर रोजी झाला आहे अर्थातच त्यांचा मुलांक सुद्धा आठ आहे.
या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची एक विलक्षण क्षमता असते. हे लोक उत्तम राजकारणी होत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदाहरणावरून आपल्याला ते दिसतेच. हे लोक कला विश्वात सुद्धा यशस्वी होताना दिसतात.
या लोकांचा आत्मविश्वास त्यांना यशस्वी होण्यास मदत करतो. या लोकांनी ठरवलं की ही गोष्ट करायची तर ती केलीच म्हणून समजा. हे लोक फारच सकारात्मक विचाराचे असतात. आपल्या मेहनतीने हे लोक कोणतीही गोष्ट सहज शक्य करतात.
हे लोक प्रचंड शिस्तप्रिय असतात. न्यायप्रविष्ठ म्हणूनही या लोकांना ओळखले जाते. या लोकांना कोणत्याच कामात कामचुकारपणा आवडत नाही. कामचुकारपणा करणाऱ्या लोकांपासून हे नेहमीच लांब राहतात आणि अशा लोकांच्या संगतीत राहणे यांना पसंत नसते.













