Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. पण हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत.
या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हफ्ता या पद्धतीने वितरित केले जातात. आतापर्यंत या योजनेच्या पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 20 हप्ते मिळाले आहेत. विशेष बाब अशी की लवकरच 21 वा हप्ता देखील दिला जाणार आहे.

खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेचा 21 वा हप्ता नेमका कधी मिळणार अशी विचारणा होत आहे. शेतकरी याच्या 21 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता याच संदर्भात एक नवीन आणि अगदीच कामाची माहिती समोर आली आहे.
खरे तर या योजनेचा 21 वा हप्ता काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना आधीच मिळाला आहे. पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता आधीच वितरित करण्यात आला आहे. दिवाळीच्या आधीच पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा पैसा देण्यात आला होता.
महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती तयार झाली होती पण सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला नाही. मात्र आता महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील 21 वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.
खरे तर सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्यासाठी शासनाला सर्वप्रथम निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर शासनाला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करता येणार आहेत.
त्यामुळे बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरचं केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना पीएम किसान चा पुढील हप्ता देऊ करणार आहे. थोडक्यात पीएम किसान चा लाभ हा 14 नोव्हेंबर नंतरच मिळणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पुढील 21 वा हप्ता वितरित होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात या योजनेच्या हप्त्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत. या योजनेचा हप्ता प्रत्येक चार महिन्यांनी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असतो.
विसावा हफ्ता ऑगस्टमध्ये जमा करण्यात आला होता. आता 21 वा हफ्ता सुद्धा लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बिहार विधानसभेचा निवडणूक निकाल लागला की या योजनेचे पैसे प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहेत.













