Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच जाहीर केल्या आहेत. निवडणुका जाहीर झाल्यात म्हणजेच आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झाली असल्याने आता लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील बंद करण्यात येणार आहे.
पुढील काही महिने लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परिपूर्ण संपत नाहीत तोवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार आहे.

पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतर मग इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न होतील. दरम्यान तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
अशी सगळी परिस्थिती असतानाच आता जानेवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. खरंतर लाडक्या बहिणींना अलीकडेच ऑक्टोबर महिन्याचा लाभ देण्यात आला आहे. ऑक्टोबर चा हप्ता वितरित करतानाच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे सोबतच महिलांना मिळतील अशा चर्चा होत्या.
परंतु तसे काही झाले नाही आणि सरकारने फक्त ऑक्टोबर महिन्याचा लाभ महिलांच्या खात्यात जमा केला आहे. पण आता आचारसंहिता लागू झाली असल्याने नोव्हेंबर चा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल आहे. रिपोर्टनुसार जानेवारी महिन्यापर्यंत आता लाडक्या बहिणींना एकही रुपया मिळणार नाही.
परंतु आचारसंहिता संपले की लाडक्या बहिणींना एकाच वेळी तीन महिन्यांचे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता संपल्यानंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे पैसे एकाच वेळी दिले जातील असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
पण या संदर्भात अद्याप फडणवीस सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे खरंच आचारसंहिता संपल्यानंतर तीन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी जमा केले जाणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.













