Mhada News : स्वप्ननगरी, मायानगरी, बॉलीवुड नगरी मुंबईत तुम्हाला पण घर खरेदी करायचे आहे का ? मग तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. Mhada प्राधिकरणाने तुमच्यासाठी आता लॉटरी विना घर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
खरंतर मुंबई सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि यामुळे या महानगरात घर घेणे म्हणजे आता दिवसा ढवळ्या स्वप्न पाहण्यासारखं वाटू लागल आहे. मुंबईत घर घेण्यासाठी लागणारे बजेट कित्येकांकडे नसते.

अशा स्थितीत मात्र म्हाडाचा पर्याय पुढे येतो. म्हाडा सर्वसामान्यांना मुंबईत घर उपलब्ध करून देते. परवडणाऱ्या किमतीत म्हाडाची घर उपलब्ध होत असल्याने अनेकांनी मुंबईत घर खरेदी करण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. परंतु म्हाडाची घरे लॉटरी द्वारे विक्री होतात.
म्हाडा कडून घर विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली जाते, यात अर्ज केलेल्या पात्र अर्जदारांची लॉटरी काढली जाते आणि यात विजेता ठरणाऱ्या अर्जदारांना घर मिळते. परंतु आता मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांना लॉटरीचा टेन्शन घेण्याचं काही कारण नाही.
कारण की लवकरच म्हाडा कडून विनालॉटरी मुंबईकरांना घर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडा मुंबई बोर्डाकडून 100 घरांची विक्री केली जाणार आहे आणि ही गृह योजना लॉटरी विना पूर्ण होईल.
अर्थात प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही घरे विकली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडा मुंबई मंडळाने याबाबतचा प्रस्ताव रेडी केला असून या प्रस्तावाला अंतिम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
आता प्राधिकरणाने याला हिरवा झेंडा दाखवला की प्रत्यक्षात ही घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर याची जाहिरात काढली जाणार आहे. दरम्यान आता आपण म्हाडा कोणत्या भागातील घरे लॉटरीविना विकणार आहे त्याबाबत माहिती पाहूयात.
ही घरे लॉटरीविना विकणार
दादर, पवई आणि ताडदेव या प्रमुख भागात ही घरे उपलब्ध राहणार आहेत. खरे तर या भागातील घरांसाठी म्हाडाने याआधी तीन वेळा लॉटरी काढली आहे. पण तीनदा लॉटरी निघूनही या घरांची विक्री झाली नाही.
ग्राहकांकडून या संबंधित भागातील घरांना प्रतिसाद मिळाला नसल्याने ही घरे आजही धुळखात पडून आहेत. उलट आता म्हाडाला या घरांच्या देखरेखी साठी मोठा खर्च करावा लागतोय. सोबतच या घरांमध्ये म्हाडाचा पैसा अडकून पडला आहे. यामुळे आता ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विकली जाणार आहेत.
ताडदेवमधील क्रिसेंट टॉवर येथे विक्री न झालेली म्हाडाची घरे, पवई तुना येथील मध्यम व उच्च उत्पन्न गटातील घर, अॅटॉप हिलमधील अल्प उत्पन्न गटातील घरांसह अन्य गृहप्रकल्पातील विक्री विना पडून असलेल्या घरांचा यामध्ये समावेश राहणार आहे.