Post Office ची ही योजना ठरणार गेमचेंजर ! दरवर्षी मिळणार दोन लाख 46 हजार रुपयांचे व्याज

Post Office Scheme : सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची आहे का ? मग तुमच्यासाठी पोस्टाचा पर्याय सर्वात बेस्ट राहणार आहे. खरे तर यावर्षी आरबीआय ने रेपो रेट मध्ये मोठी कपात केली आणि यानंतर देशभरातील सरकारी आणि खाजगी बँकांनी एफडी योजनांचे व्याजदर घटवले.

पण आजही पोस्टाच्या विविध बचत योजनांचे व्याजदर कायम आहे. पोस्ट ऑफिस कडून सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी बचत योजना चालवल्या जातात. जस की आपणांस ठाऊकच आहे की, निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची चिंता अनेकांना असते.

जर तुम्हीही त्यापैकीचं एक असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल नक्कीच जाणून घेतले पाहिजे. या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना दरवर्षी दोन लाख 46 हजार रुपयांपर्यंतचे व्याज मिळू शकते.

पण ही योजना फक्त सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी आहे. त्याशिवाय यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना इतरही अनेक लाभ दिले जातात याबाबत आज आपण येथे थोडक्यात माहिती पाहणार आहोत. 

कशी आहे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ?

 पोस्ट ऑफिस कडून सुरू करण्यात आलेली सीनियर सिटीजन सेविंग स्कीम पाच वर्षांची आहे पण योजनेचा कालावधी पूर्ण झाला की पुन्हा एकदा ही योजना तीन वर्षांसाठी एक्सटेंड करता येऊ शकते.

या योजनेत गुंतवणूकदारांना सुरुवातीला पैसे गुंतवावे लागतात आणि मग केलेल्या गुंतवणुकीवर पोस्टाकडून निश्चित व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक 8.2% दराने व्याज दिले जात आहे. हे व्याजदर कोणत्याही बँकेच्या एफडी योजनांपेक्षा अधिक आहे.

त्यामुळे अलीकडे या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येणे शक्य आहे तसेच कमाल गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

आता जर एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या या योजनेत एक रकमे 30 लाखाची गुंतवणूक केली तर त्याला दर महिन्याला वीस हजार पाचशे रुपयांची व्याज मिळणार आहे वार्षिक आधारावर हेच व्याज 2 लाख 46 हजार रुपये होते.

म्हणजे 30 लाख रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला दोन लाख 46 हजार रुपये वार्षिक व्याज स्वरूपात रिटर्न दिले जाणार आहेत. या योजनेत केलेले गुंतवणूक आयकर विभागाच्या कलम 80 C अंतर्गत कर सवलतीचा पण लाभ दिला जात आहे.